Chaitra Navratri 2024 : सध्या चैत्र नवरात्रीचा उत्साह सगळीकडे सुरु आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची अगदी मनोभावे पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. देवीची पूजा केल्याने शारीरिक शांतीबरोबरच मानसिक शांतीही मिळते. पण, देवीला प्रसन्न करण्यासाठी ग्रहांची देखील चाल पाहावी लागते. चैत्र नवरात्रीत राहू, केतू आणि शनिच्या वाईट परिणामांपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील. हे उपाय केल्याने तुम्ही शनिच्या प्रभावापासून दूर राहाल. तर, तुमच्या जीवनात सुख-समृद्धीसह धनलाभ व्हावा यासाठी कोणते उपाय करावेत ते समजून घ्या.
राहु, केतु आणि शनिदेवाला शांत करण्यासाठी 'हे' उपाय करा
ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीवर राहू, केतू आणि शनिदेवाचा दुष्प्रभाव सुरु आहे त्या व्यक्तीने या चैत्र नवरात्रीत चांदीचा एक हत्ती खरेदी करावा आणि तो आपल्या घरच्या देवाऱ्ह्यात ठेवावा. असे केल्याने राहू, केतूच्या वाईट परिणामांपासून आपण दूर राहतो. त्याचबरोबर राहुचा परिणाम तुमच्या करिअर आणि भौतिक सुख तसेच मानसिकतेवर होतो. तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. यावेळी हा उपाय करणं योग्य ठरेल.
भगवान शंकराला लवंग अर्पण करा
चैत्र नवरात्री दरम्यान राहू, केतू आणि शनिच्या परिणामांपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्यासाठी भगवान शंकराला लवंग अर्पण करा. हा एक छोटासा उपाय आहे. हा उपाय केल्याने राहू, केतू शांत होऊ शकतात. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पठण केल्यानेसुद्धा राहू, केतूचा दोष कमी करता येऊ शकतो. तसेच, सकाळी लवकर उठून हनुमान चालिसाचे पटण केल्यानेही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील.
शंकराची आराधना केल्याने शनिदेवाचे वाईट प्रभाव कमी होतात
ज्या व्यक्तीवर शनिदेवाच्या साडेसतीचा प्रभाव असतो अशा व्यक्तीने भगवान शंकराची पूजा करावी. यावेळी भगवान शंकराची पूजा केल्याने शनिदेवाचे वाईट प्रभाव कमी होतात. शनिदेव हे भगवान शंकराचे महान भक्त मानले जातात. भगवान शंकराची पूजा केल्याने शनिदेवाची महादशा जात असलेल्या व्यक्तीसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरेल. यासोबतच या नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरजू लोकांना दान करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि शुभ परिणाम देतात. याबरोबरच नवरात्रीत विधीनुसार चंद्रघंटा आणि ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने राहू केतूचे वाईट प्रभाव दूर होतात. नवरात्रीच्या काळात लाल कपड्यात पाच गाई ठेवाव्यात आणि घरातील तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवाव्यात. या उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: