Astrology Today 16 April 2024 : आज, मंगळवार, 16 एप्रिल रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे, ही तिथी महाअष्टमी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी माता भगवतीची आठवी शक्ती महागौरीची पूजा केली जाते. आज चंद्र कर्क राशीत जाणार आहे. सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील आणि त्यांना त्यांच्या कामात मोठं यश मिळेल. नोकरदार लोकांना आज एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमच्या भावना देखील व्यक्त कराल, ज्यामुळे तुमचं मन हलकं होईल. आज नवरात्रीमुळे घरात धार्मिक वातावरण असेल. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, आज तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल. आज तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा चांगला वेळ जाईल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळवारचा उपाय : संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी 11 पिंपळाची पानं स्वच्छ करून त्यावर चंदनाने श्रीराम लिहून हनुमानजींना अर्पण करा.
कन्या रास (Virgo)
आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. कन्या राशीचे लोक आज आपली उद्दिष्टं पूर्ण करू शकतील आणि त्यांचे अडकलेले पैसेही वसूल करतील. आज तुम्ही सर्व खर्च सहज हाताळू शकाल, तसेच पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी आज मिळू शकते. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. व्यापारी आज चांगला नफा कमावतील आणि दिवसभर व्यावसायिक कामात व्यस्त राहतील. ज्या कामांमुळे तुम्ही चिंतेत होता ते आज सहज पूर्ण होईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.
कन्या राशीसाठी मंगळवारचा उपाय : वादातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानजींच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि 11 परिक्रमा केल्यानंतर हनुमान चालीसा पाठ करा आणि हनुमान मंत्रांचा जप करा.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून आज चांगला परतावा मिळू शकेल आणि तुम्ही कुटुंबाच्या सर्व गरजा सहज पूर्ण करू शकाल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल. जर तुम्ही न्यायालयीन खटल्यात अडकले असाल तर आज तुम्हाला त्यातून दिलासा मिळू शकतो. आज हनुमानजींच्या कृपेने नोकरदार आणि व्यावसायिकांना लाभ होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता खरेदी करू शकता आणि तुम्हाला मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधीही मिळेल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळवारचा उपाय : आर्थिक प्रगतीसाठी पाच मंगळवार मंदिरात दिवा लावा आणि लाल गाईला भाकरी खाऊ घाला.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात यश मिळेल आणि अभ्यासात ते चांगली कामगिरी करतील. तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुमचं नाव उंचावेल. आज तुमचा आत्मविश्वास खूप जास्त असेल, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. प्रेमसंबंधांत असणारे आज आपल्या जोडीदारासोबत कुठल्यातरी धार्मिक स्थळी जातील. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. तुम्ही संपूर्ण कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन कराल. अविवाहित लोक आज एखाद्या कार्यक्रमात एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात.
धनु राशीसाठी मंगळवारचा उपाय : नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण करा.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांचं एखादं दीर्घकाळ प्रलंबित काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींकडून व्यवसायाशी संबंधित काही मदत घेऊ शकता, त्यांच्या मदतीने तुम्ही व्यवसायात काहीतरी नवीन सुरू करण्याची योजना आखू शकता. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्याल, तुमचं सांसारिक सुखही वाढेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमच्यावरचं कर्जही हळूहळू कमी होईल. मुलांच्या कोणत्याही परीक्षेच्या निकालामुळे घरात आनंदाचं वातावरण असेल.
कुंभ राशीसाठी मंगळवारचा उपाय : मंगळवारी हनुमानाला नारळ अर्पण करावा, असं केल्याने सर्व संकटं दूर होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: