Capricorn Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : मकर राशीसाठी नवीन आठवडा शुभ परिणाम घेऊन येणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्हाला या आठवड्यात आर्थिक तंगी जाणवणार नाही. मात्र, आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. एकूणच मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)


या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रियकराशी मनमोकळेपणाने बोला, तुमच्या भावना व्यक्त करण्यास संकोचू नका. तुम्हाला लव्ह लाईफमध्ये आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. तुम्ही रोमँटिक डिनरचा प्लॅन करू शकता, जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन बनवू शकता. तुम्ही तुमच्या पार्टनरला गिफ्ट देऊन सरप्राईजही करू शकता. या आठवड्यात तुम्ही प्रियकराची तुमच्या घरच्यांशी भेट घडवून देऊ शकता आणि लग्नाबद्दल चर्चा करू शकता. जे प्रेमसंबंध तुटण्याच्या मार्गावर होते ते आठवड्याच्या मध्यापर्यंत पुन्हा नीट मार्गावर येतील.


मकर राशीचे करिअर  (Capricorn Career Horoscope)


नवीन आठवड्यात नोकरीत तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील, त्यामुळे कामासाठी सज्ज राहा. मिटींगमध्ये तुम्ही तुमची मतं मांडा, योजना सुचवा. हेल्थ केअर, बँकिंग, आयटी, डिझायनिंग, ऑटोमोबाईल आणि हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल्सना नोकरीसाठी दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जाण्याच्या संधी मिळतील. या आठवड्यात तुमचा कामानिमित्त प्रवास होईल. व्यावसायिक या आठवड्यात चांगला नफा कमवतील, तुम्ही एखादा नवीन जोड व्यवसाय देखील सुरू करू शकता. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं.


मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)


तुमचं आयुष्य या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल. तुमच्या जीवनात समृद्धी येईल, म्हणून तुम्ही दानधर्मात देखील पैसे खर्च करू शकता. तुमचा पगार वाढवण्यासाठी तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. या आठवड्यत भावंडांसोबत चाललेले मालमत्तेशी संबंधित वाद सुटतील. वडिलधारे लोक मुलांमध्ये मालमत्तेची विभागणी करू शकतात. कौटुंबिक कार्यक्रमासाठी तुम्ही पैसे बाजूला काढून ठेवावे.


मकर राशीचे आरोग्य  (Capricorn Health Horoscope)


नवीन आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही दारू आणि तंबाखू दोन्ही सोडून द्यावं, फुप्फुसांशी संबंधित समस्या जाणवू शकतात. काही लोकांना मानसिक तणावाचा, नैराश्येचा सामना करावा लागू शकतो. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत जास्त वेळ घालवा. मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी योग किंवा मेडिटेशन करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Sagittarius Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : नवीन आठवड्यात धनु राशीचं नशीब पालटणार; खिसा भरलेला राहणार, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या