Budhaditya Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती आणि त्यामुळे तयार होणाऱ्या राजयोगांना खूप महत्त्व आहे. ग्रह हे ठराविक काळानंतर आपली राशी बदलत असतात. ज्यावेळी एखाद्या राशीत एकापेक्षा दोन ग्रह एकत्र येतात, त्यावेळी त्या ग्रहांचा संयोग होऊन राजयोग निर्माण होतात. या राजयोगांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो. लवकरच असाच एक विशेष राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहे, ज्याचा बराच फायदा काही राशींच्या लोकांना होईल.


ज्योतिषशास्त्रानुसार,  सूर्य आणि बुध मिळून मीन राशीमध्ये बुधादित्य राजयोग निर्माण करतील. 7 मार्चला ग्रहांचा राजकुमार बुध मीन राशीत प्रवेश करेल, तर 14 मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. अशा प्रकारे 14 मार्चला या दोन ग्रहांची युती होईल, ज्याचा विशेष लाभ 3 राशींना मिळणार आहे. ज्या राशींमध्ये बुधादित्य राजयोग तयार होतो, त्या लोकांचं भाग्य खुलतं आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या राजयोगाचा फायदा होणाऱ्या 3 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


कुंभ रास (Aquarius)


बुधादित्य राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या धन आणि वाणीच्या घरात तयार होणार आहे . त्यामुळे या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच, या काळात तुमचा बँक बॅलन्स पूर्वीपेक्षा खूप चांगला असेल. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. या काळात समाजातील तुमची प्रतिमा आणि मान वाढेल.


वृषभ रास (Taurus)


बुधादित्य राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो, कारण हा योग तुमच्या कुंडलीत उत्पन्नाच्या घरात निर्माण होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. या काळात जोडीदारासोबतचं तुमचं नातं आणखी बहरेल, तुमच्या नात्यात प्रेम वाढेल, एकमेकांबद्दल आदर वाढेल. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांविषयी काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोक एखादी मोठी डील फायनल करू शकतात, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.


कन्या रास (Virgo)


बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे, हा राजयोग तुमच्या कुंडलीच्या सातव्या घरात तयार होणार आहे. या काळात तुमचं वैवाहिक जीवन अधिक बहरेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळं येतील. या काळात संतती सुखाची इच्छा असणाऱ्यांना संतती सुख मिळेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा:


Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला करा 'या' वस्तूंचं दान; महादेवाची राहील सदैव कृपा, कधीही भासणार नाही पैशांची कमी