नागपूर : राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नेते नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस ( Maharashtra Assembly Winter Session 2023) अक्षरशः रणकंदणाने गाजला. पहिल्या दिवशी विरोधक अन् सत्ताधारी एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून त्यांच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्याची सांगण्याची वेळ आली. 


आजच आमच्याकडे अंबादास दानवे यांचा प्रवेश झाल्याचे जाहीर करून टाका


आज (8 डिसेंबर) आजच्या दुसऱ्या दिवसांच्या सुद्धा नवाब मलिक यांच्यावरून तसेच मराठा आरक्षणावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळाच प्रसंग घडला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी आजच आमच्याकडे अंबादास दानवे यांचा प्रवेश झाल्याचे जाहीर करून टाका, अशी मिश्किली केली. 


आता नेमकं कोण कुठ आहे हेच कळत नाही 


यानंतर  भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा खोचक टोला लगावला. ते म्हणाले की, सगळ्यांना सोबत घ्या आणि आम्हाला बाहेर करा. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तेवावरून खोचक टोला दिल्याची चर्चा रंगली. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. त्यामुळे आता नेमकं कोण कुठ आहे हेच कळत नाही. हे सभागृह नोंद घेईल की आज विधानपरिषद शतक महोत्सव वर्ष आहे आणि यामधे सभापती नाही. यापूर्वी 80 टक्के समाज संबंधित प्रश्न उपस्थित होत होते आणि 20 टक्के राजकीय प्रश्न होते. आता, मात्र परिस्थिती वेगळी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. 


दरम्यान आजच्या दिवसाच्या कामकाजामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा उपस्थित होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण हा मुद्दा अत्यंत संवेदनशील झाला आहे. या संदर्भातील आता कायदेशीर लढाई सुद्धा सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आज सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेताना सुनावणी पूर्ण केली आहे. मात्र त्यावरती निर्णय अजूनही दिलेला नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या