Continues below advertisement


Budh Transit 2025: ते म्हणतात ना, एखाद्याचं नशीब बदलण्याची वेळ आली की त्याला हळूहळू सकारात्मकतेची लक्षणं दिसायला सुरूवात होते. ज्योतिषशास्त्रानुसार, पाहायला गेलं तर तुमच्या पत्रिकेत बुध शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचे नशीब चमकते. तो कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक बनतो. ज्योतिषशास्त्रात, ग्रहांचा राजकुमार बुध हा धन, बुद्धिमत्ता, वाणी, संवाद, व्यवसायाचा कारक आहे. दिवाळीपूर्वी ऑक्टोबरमध्ये बुध दोनदा आपल्या चालीत महत्त्वाचे बदल करणार आहे. हे बदल अनेक लोकांचे जीवन देखील बदलतील. जाणून घ्या त्या भाग्यशाली राशींबद्दल...


बुध तुमचं भाग्य बदलेल...


ज्योतिषशास्त्रानुसार, जर बुध शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचे नशीब चमकते. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच बुध ग्रहाचा उदय होत आहे आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुध तूळ राशीतही भ्रमण करेल. ज्याचा मोठा फायदा 3 राशींच्या लोकांवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 2 ऑक्टोबर रोजी बुधाचा कन्या राशीत उदय होईल. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, 3 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. बुधाचा स्वतःच्या कन्या राशीत उदय होईल आणि नंतर तूळ राशीत भ्रमण करेल, ज्याचा अत्यंत शुभ परिणाम होईल. कोणत्या राशींसाठी ते शुभ असेल ते जाणून घ्या.


मेष


ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबरमध्ये बुध राशीच्या हालचालीतील बदलामुळे मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात. विशेषतः जे अविवाहित आहेत त्यांना जोडीदार मिळेल, लग्न निश्चित होऊ शकते. सणासुदीच्या काळात व्यावसायिकांना भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.


सिंह


ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबरची सुरुवात सिंह राशीच्या लोकांसाठीही चांगली राहील. तुम्हाला करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती मिळू शकते. तुम्हाला नवीन स्रोतांकडून पैसे मिळतील. पदोन्नती मिळू शकते. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळेल.


हेही वाचा :           


आजपासून 'या' 3 राशींचं टेन्शन संपलं समजा! शनि-बुध आमने सामने येणार, जबरदस्त प्रतियुती योग बक्कळ पैसा देईल..


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)