Budh Margi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नुकतंच 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनिने मार्गी (Shani Margi) चाल केली. शनिच्या पाठोपाठ आता बुध ग्रहसुद्धा मार्गी म्हणजेच सरळ चाल चालणार आहे. बुध ग्रह (Budh Margi) तूळ राशीत मार्गी झाल्याने अनेक राशींसाठी हा काळ लकी ठरणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement


सर्व ग्रहांप्रमाणेच ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह ठराविक काळासाठी राशी परिवर्तन करतात. पण, काही कालावधीनंतर बुधाच्या सुद्धा चालीत बदल होतो. यालाच ज्योतिष शास्त्रात मार्गी किंवा वक्री चाल म्हणतात. सध्या बुध ग्रह तूळ राशीत संक्रमण करणार आहे. 


तूळ राशी बुध ग्रह सध्या वक्री अवस्थेत आहे. आता याच राशीत राहून बुध ग्रह शनिवारी म्हणजेच 29 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजून 07 मिनिटांनी मार्गी होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाची ही चाल फार महत्त्वाची मानली जातेय. यामुळे अनेक राशींना लाभ मिळणार आहे. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीसाठी बुध ग्रहाची सरळ चाल नोकरी-व्यवसायात लाभ देणारी असणार आहे. या काळात तुमची दिवसेंदिवस प्रगती पाहायला मिळेल. प्रगतीचे अनेक योग जुळून येतायत. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रहाच्या मार्गी चालीने तुमच्या करिअरला नवीन दिशा मिळेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, एखादं चांगलं प्रोजेक्ट तुमच्या हाती लागू शकतं. व्यवसायात तुम्हाला लाभ मिळेल. नवीन ऑर्डर्स येत राहतील. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी देखील बुध ग्रहाची मार्गी चाल दिशा बदलणारी ठरणार आहे. या काळात तुमच्या आजूबाजूला अनेक सकारात्मक गोष्टी घडताना दिसतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली असेल. बुध ग्रहाबरोबरच देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद असेल. 


हे ही वाचा :                                       


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Horoscope Today 29 November 2025 : आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा; शनिदेवाच्या कृपेने संकट टळेल, संध्याकाळपर्यंत मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य