Horoscope Today 28 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 28 नोव्हेंबर 2025, आजचा वार शनिवार आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज अडलेली कामे दूर होतील, मात्र पैशांबाबत हाता-तोंडाशी आलेल्या गोष्टी रेंगाळतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज महिला धडाडी दाखवतील, आपण बरे अन् आपले काम बरे असा दृष्टिकोन राहील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल, आपल्या आवडत्या जोडीदाराचा प्रतिसाद मनासारखा मिळाल्यामुळे आनंदी राहाल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रत्येक गोष्टी भावनांच्या निकषावर घासून चालत नाहीत, याचा प्रत्यय येईल. काही बाबतीत व्यवहारही बघावा लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज थोडे गंभीर आणि चंचल बनाल. व्यवसाय नोकरीत मनावर ताबा ठेवावा लागेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज शुल्लक कारणावरून भावनेचा उद्रेक होऊन चालणार नाही, हट्टी आणि दुराग्रही स्वभाव राहील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज स्पष्टवक्तेपणामुळे लोकांची मने दुखावली जातील, प्रकृती बिघडण्याची शक्यता
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज गोड बोलणाऱ्या लोकांचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही, मुलांशी थोडे मतभेद संभवतात
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज नवीन प्रॉपर्टी घेण्यासंबंधी अडचणी उद्भवतील, आज तुमची ताकद, कला दाखवण्याची संधी मिळेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात तारेवरची कसरत करावी लागेल, मनाविरुद्ध घडलेल्या घटनेसाठी काळचं औषध आहे हे लक्षात ठेवा
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज करिअर बाबत काळजी घ्या, उदासीन असलात तरी आपले काम चौक बजावाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज वाहने जपून चालवा, व्यवसायात जे काम करीत असाल, त्यामध्ये जपून राहण्याची आवशक्यता आहे.
हेही वाचा
Shani Margi 2025: प्रतिक्षा संपली! 28 नोव्हेंबरपासून 3 राशींसाठी संपत्तीचा मार्ग खुला, शनि मार्गी होणार, पैसा, नोकरी, कारचं स्वप्न पूर्ण...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)