Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध (Budh Gochar) ग्रह एका ठराविक अंतराने नक्षत्र परिवर्तन करतात. याचा सर्व 12 राशींवर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने परिणाम होतो. बुध ग्रहाला शिक्षण, व्यवसाय, बुद्धी, बौद्धिक क्षमता आणि तर्क-वितर्काचा कारक ग्रह मानला जातो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 29 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 04 वाजून 17 मिनिटांनी बुध ग्रह शनिच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर, 22 ऑग्सट पर्यंत बुध ग्रह याच नक्षत्रात असणार आहे. यामुळे अनेक राशींना याचा लाभ मिळू शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी बुध ग्रहाचं पुष्य नक्षत्र अनेक अर्थाने लाभदायी ठरणार आहे. या काळात या राशीच्या चौथ्या चरणात हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तुमच्या आरोग्यात हळुहळू सुधारणा होईल. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
बुध ग्रहाचं पुष्य नक्षत्रात प्रवेश करुन या राशीच्या दुसऱ्या चरणात स्थित असणार आहे. या काळात तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा जागृत होईल. शत्रूवर विजय मिळवता येईल. तसेच, सुख-संपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळेल. या दरम्या तुमची आर्थिक स्थितीदेखील चांगली असणार आहे. मात्र, तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
व्यवसायाचा दाता बुध ग्रह पुष्य नक्षत्रात प्रवेश करुन या राशीच्या दहाव्या चरणात स्थित असणार आहे. त्यामुळे या राशीला विशेष लाभ मिळेल. तसेच, तुमच्या कार्याचा विस्तार वाढलेला दिसेल. समाजात तुमचा चांगला मान-सन्मान वाढेल. तसेच, या दरम्यान तुमची अनेक कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. भौतिक सुख-समृद्धीचा तुम्ही लाभ घ्याल. जर तुम्हाला नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभ असणार आहे.
हेही वाचा :