Guru Purnima 2025 Shubh Yog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 10 जुलै 2025 चा दिवस हा सर्वत्र गुरुपौर्णिमेचा (Guru Purnima) दिवस म्हणून साजरा केला जातोय. आजच्या दिवशी ग्रह नक्षत्रांची फार शुभ स्थिती पाहायला मिळतेय. आज गजकेसरी योग, मालव्य राजयोग,  ऐंद्र योगसह अनेक शुभ ग्रहांचा संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या  राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आज सूर्य आणि गुरु ग्रह मिळून मिथुन राशीत गुरुआदित्य राजयोग निर्माण करणार आहेत. तर, चंद्र ग्रह गुरु ग्रहासह गजकेसरी राजयोग निर्माण करणार आहे. या व्यतिरिक्त शुक्र ग्रहाचं वृषभ राशीत जाण्याने मालव्य राजयोगाचा शुभ योग निर्माण जाला आहे. त्याचबरोबर ऐंद्र योगाचा शुभ संयोग देखील जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी कोणत्या राशी भाग्यशाली आहेत हे जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ वृषभ राशीच्या लोकांना होणार आहे. या काळात तुमच्या स्वभावात सकारात्मक बदल दिसतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक केलं जाईल. नवीन नोकरीची ऑफर देखील तुम्हाला मिळू शकते. तसेच, धनसंपत्तीचा चांगला लाभ घेता येईल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आज जुळून आलेला शुभ योग फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमध्ये दोघांवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. तुमचं आरोग्य चांगलं राहील. कुटुंबियांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असल्यास तुम्ही करु शकता. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात वाढ झालेली दिसेल. 

वृश्चिक रास (scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरु पौर्णिमेचा शुभ संयोग फार लाभदायक ठरेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. कंपनीत तुम्हाला लाभ मिळू शकतो. तसेच, नवीन घर किंवा वाहन तुम्ही खरेदी करु शकता. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यवहारात सकारात्मक बदल घडून आलेले दिसतील. तसेच, तुमचं मन उत्साहित राहील. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. 

हेही वाचा :                          

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Guru Purnima 2025 : गुरु: साक्षात् परब्रह्म! गुरुपौर्णिमेच्या आपल्या गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश