Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध (Budh Gochar) ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणतात. बुध ग्रह बुद्धी, संचार, व्यवसाय, शिक्षणाचा कारक ग्रह मानला जातो. तसेच, बुध ग्रह (Mercury) हा कन्या आणि मिथुन राशींचा स्वामी ग्रह आहे. तसेच, बुध ग्रह जेव्हा वक्री चाल चालतात तेव्हा सर्व राशींवर याचा उलटा प्रभाव होतो. या काळात, जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ लागतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 10 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी 12 वाजून 31 मिनिटांनी बुध ग्रह वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. जवळपास 20 दिवसांपर्यंत बुध ग्रह वक्री चाल चालतील. या काळात बुध ग्रहाची दृष्टी तिसऱ्या, सातव्या आणि दहाव्या स्थानी आहे. यामुळे तुमच्या बोलण्यातून गैरसमज, व्यवसायात नुकसान तसेच, नोकरीवर संकट येण्याची शक्यता आहे. तर, या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी बुध ग्रहाची वक्री चाल आठव्या चरणात होणार आहे. त्यामुळे पैशांशी संबंधित तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यावर कर्जाचा डोंगर चढू शकतो. एखाद्या दिर्घकालीन आजाराने तुम्ही त्रस्त असू शकता. तुमच्या बोलण्यातून अनेक गैरसमज निर्माण होतील. यासाठी बुधवारच्या दिवशी हिरवे मूग दान करा. तसेच, 'ॐ बुं बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीत बुध ग्रहाची वक्री चाल सातव्या चरणात होणार आहे. त्यामुळे तुमच्या पार्टनरशिपवर तसेच, लग्नावर याचा नकारात्मक प्रभाव दिसून येईल. तसेच, या दरम्यान तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे वाद होऊ शकतात. नात्यात तणाव निर्माण होईल. तसेच, व्यवसायात तुमची पार्टनरशिप तुटूसुद्धा शकते. दूरच्या प्रवासाला जाऊ नका. यावर उपाय म्हणजे गणपतीला दुर्वा वाहा. तसेच, हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. या काळात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या चौथ्या चरणात हा ग्रह विराजमान असणार आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा परिणाम दिसून येईल. तसेच, प्रॉपर्टीच्या संदर्भात अनेक वाद होऊ शकतात. घरात मानसिक शांती तुम्हाला मिळणार नाही. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात देखील तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. पैशांची गुंतवणूक या काळात करु नका, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे विष्णू मंदिरात दूध चढवा, हिरव्या रंगाचे कपडे दान करा.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या बाराव्या चरणात बुध ग्रह आपली वक्री चाल चालणार आहेत. या भावात खर्च, नुकसानीसारख्या गोष्टी घडतील. त्यामुळे तुमच्या खर्चात विनाकारण वाढ झालेली दिसेल. लांबचा प्रवास करणं टाळा. तसेच, तुमचा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो. यावर उपाय म्हणजे हिरव्या भाज्या दान करा. बुधवारी उपवास करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :