Budh Shani Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाला (Mercury) बुद्धी, संवाद, तर्क, वाणिज्य आणि विश्लेषणाचा कारक ग्रह मानतात. जेव्हा बुध ग्रह कोणत्याही राशीत किंवा नक्षत्रात परिवर्तन करतात तेव्हा त्याचा थेट प्रभाव व्यक्तीच्या विचारांवर, निर्णयक्षमतेवर आणि आर्थिक स्थितीवर पडताना दिसतो. ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह सध्या शनीच्या (Shani Dev) अनुराधा नक्षत्रात विराजमान आहे. तर, 20 नोव्हेंबरपर्यंत बुध ग्रह याच नक्षत्रात असणार आहे. या काळात बुध ग्रहाची स्थिती काही राशींसाठी शुभ परिणाम देणारी ठरेल. या लकी 3 राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
बुध ग्रहाचं हे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रगतीचं ठरणार आहे. या काळात तुम्हाला यश संपादन करता येईल. तुमच्या वाणीत गोडवा दिसेल. तसेच, तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल झालेला दिसून यईल. व्यवसायाशी संबंधित काही योजनांमध्ये यशस्वी व्हाल. रखडलेली कामेही पूर्ण होतील. जे लोक नोकरी करतायत त्यांच्यासाठी हा प्रगतीचा संकेत आहे. तसेच, मित्रांच्या सहयोगाने तुम्हाला तुमची कामे पूर्ण करता येतील. नवीन गोष्टी शिकून घ्याल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीचा स्वामी ग्रह स्वत: बुध ग्रह आहे. यासाठीच अनुराधा नक्षत्रात बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन या राशीसाठी जास्त लाभदायी ठरेल. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. मुलांची अभ्यासात एकाग्रता दिसून येईल. नवीन प्रोजेक्ट्स हाती लागतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केलं जाईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं अनुराधा नक्षत्रात होणारं संक्रमण आर्थिक स्थिरता आणि आत्मविश्वास देणारं असणार आहे. या ाकळात तुमच्या जुन्या योजना यशस्वी होताना दिसतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार झालेला दिसेल. तसेच, कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. या काळात तुम्हाला मानसिक शांती मिळेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुकही केलं जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :