Mercury Transit 2024 : ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध (Mercury) मिथुन राशीत स्थित आहे. 29 जून 2024 पर्यंत बुध मिथुन राशीत राहील. यानंतर बुध मार्गीकृत होऊन कर्क राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीमध्ये होत असलेलं बुधाचं संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल. 4 राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अशुभ ठरू शकतं. 29 जूनपर्यंतचा काळ या लोकांसाठी खूप कठीण असू शकतो. या काळात या लोकांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, शत्रूंमुळे त्रास होऊ शकतो, आजारपण किंवा अपघात होण्याचीही शक्यता आहे. बुधाच्या चालीमुळे नेमकं कोणत्या राशींना (Zodiac Signs) सावध राहावं लागेल? जाणून घेऊया.


बुध संक्रमणामुळे 'या' राशींना राहवं लागणार सावध


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी 29 जूनपर्यंतचा काळ कठीण असेल. या काळात तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता जाणवेल. या काळात तुमचा खर्चही जास्त होईल. काही लोकांना कर्ज किंवा उसने पैसे मागावे लागतील. अशी परिस्थिती टाळण्यासाठी काळजीपूर्वक खर्च करणं चांगलं राहील. तसेच या काळात वादविवाद टाळा. 


वृश्चिक रास (Scorpio)


या काळात पैसा तुमच्याकडे येईल, पण तुम्ही तरी समाधानी होणार नाही. अशा वेळी चुकूनही अनैतिक कामातून पैसे कमावण्याचा विचार करू नका. चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. कोणतेही नियम मोडू नका किंवा काहीही चुकीचं करू नका. ईर्षेमुळे एखादा सहकारी तुमचं नुकसान करू शकतो. या काळात वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. 


मकर रास (Capricorn)


बुधाच्या राशी बदलामुळे मकर राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक आव्हानं येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या सवयीमुळे सर्वात जास्त फटका बसेल. अनावश्यक राग आणि आक्रमकता तुमची नाती बिघडवेल आणि यामुळे तुमच्या करिअरमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि धीर धरा. वादांपासून दूर राहा. 


मीन रास (Pisces)


29 जूनपर्यंतच्या काळात तुम्ही काही चुकीचे निर्णय घेऊ शकता, त्यामुळे या काळात मोठे निर्णय घेणं टाळा. नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्यासाठी हा काळ चांगला नाही, त्यामुळे जरा थांबा. तुमच्या प्रियकरावर शंका घेऊ नका, संभाषणातून समस्या सोडवणं चांगलं. या काळात तणाव जाणवेल. या काळात कर्ज किंवा उधार घेऊ नका, ही उधारी वाढतच जाईल आणि तुमची प्रतिमा खराब होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Budh Gochar 2024 : येत्या दिवसांत उजळणार 'या' 3 राशींचं भाग्य; आर्थिक स्थिती होणार मजबूत, कुबेराच्या कृपेने बक्कळ धनलाभ