Budh Gochar 2024 : बुध ग्रहाला सूर्यमालेतील ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. 14 जून रोजी रात्री 11 वाजून 9 मिनिटांनी बुधाचं राशी परिवर्तन होईल. वृषभ ग्रहानंतर आता बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. बुधाच्या संक्रमणाने मेष आणि मिथुनसह 5 राशीच्या लोकांचा सुवर्ण काळ सुरू होईल, या राशीच्या लोकांच्या जीवनात 3 मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतील.


ज्योतिषशास्त्रानुसार, बुध 14 जून ते 29 जूनदरम्यान मिथुन राशीत असेल. हा 16 दिवसांचा काळ 5 राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. मिथुन राशीत झालेल्या बुधाच्या मार्गक्रमणाचा फायदा नेमका कोणत्या 5 राशींना (Zodiac Signs) होणार? जाणून घेऊया.


बुधाचं मार्गक्रमण या 5 राशींसाठी ठरणार शुभ


मेष रास (Aries)


बुधाचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकता. करिअरच्या वाढीसाठी तुम्हाला मोठ्या ऑफर मिळू शकतात. तुम्हाला या काळात नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे, जी तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते. तुमचा निर्णय आणि काम दोघांचंही कौतुक होईल. तब्येत ठणठणीत राहील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन काम सुरू करण्याची संधी मिळू शकते. तुमचे योग्य निर्णय तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील.


मिथुन रास (Gemini)


बुधाचं मार्गक्रमण व्यावसायिकांसाठी खूप शुभ आणि फलदायी ठरू शकतं. हे 16 दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे असतील, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर नफा मिळण्याची अपेक्षा आहे. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. नोकरदार नवीन नोकरीचाही विचार करू शकतात. ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांच्यासाठी नवनवीन स्थळं येऊ शकतात.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचं मार्गक्रमण शुभ ठरेल. या काळात तुमच्या धन-वैभवात वाढ होऊ शकते. 14 जूननंतर तुम्हाला व्यवसायात एखादी मोठी डील मिळू शकते किंवा तुमचं काही काम यशस्वी होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. या काळात तुम्ही तुमची काही अपूर्ण कामं पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता. तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी आणि शांतीचं असेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.


तूळ रास (Libra)


बुधाच्या राशी परिवर्तनामुळे तूळ राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. बुधाचं संक्रमण नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शुभ ठरेल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील. यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकता. तुमच्या कामात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.


धनु रास (Sagittarius)


बुधाचा राशी बदल भागीदारीमध्ये काम करणाऱ्या लोकांना खूप चांगले परिणाम देऊ शकतो. या काळात तुम्हाला नवीन डील मिळू शकतात, गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्या लोकांनाही फायदा होईल, त्यांचं उत्पन्न वाढू शकतं. या काळात तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त बचत करू शकता. तुम्हाला अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Vakri 2024 : जूनमध्ये शनि वक्रीमुळे 'या' 4 राशींना बसणार फटका; पाण्यासारखा पैसा वाया जाणार, सर्व कामात येणार अडथळे