Budh Asta 2024 : ज्योतिषशास्त्रात बुध (Mercury) हा एक महत्त्वपूर्ण ग्रह आहे. बुध हा बुद्धिमत्ता, पैसा, व्यवसाय, संवाद, वाणी आणि करिअरचा कारक मानला जातो. जेव्हा कुंडलीत बुध ग्रह कमजोर असतो, तेव्हा करिअरमध्ये अडथळे निर्माण होतात आणि लवकर प्रगती होत नाही. त्यातच आता 4 एप्रिल रोजी बुध ग्रहाचा मेष राशीत अस्त होईल, ज्याचा काही राशींवर नकारात्मक परिणाम पडेल.
4 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजून 36 मिनिटांनी बुध ग्रहाचा मेष राशीत अस्त (Budh Asta 2024) होईल. बुध ग्रहाच्या अस्तामुळे 6 राशींच्या लोकांवर याचा नकारात्मक प्रभाव पडेल. या राशीच्या लोकांच्या नोकरी-व्यवसायात अडथळे निर्माण होतील. बुधाच्या अस्तामुळे कोणत्या राशींना अडचणींचा सामना करावा लागणार? जाणून घेऊया
वृषभ रास (Taurus)
कामाच्या ठिकाणी चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय ठेवावा लागेल, पण बुध अस्ताच्या परिणामामुळे तुम्हाला सहकारी आणि अधिकारी दोघांचंही सहकार्य मिळणार नाही. यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी दबाव जाणवेल. तुमचं पद आणि पगाराबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. तुमचे सहकारी तुमच्यावर टीका करू शकतात, त्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं, तुम्ही नोकरी बदलण्याचा निर्णय देखील घेऊ शकता.
मिथुन रास (Gemini)
बुधाचा अस्त मिथुन राशीच्या करिअरमध्ये अनेक नकारात्मक बदल घडवून आणेल. या काळात तुम्हाला काम करावसं वाटणार नाही. नोकरीबद्दस अनेक नकारात्मक विचार तुमच्या मनात येतील. कामाच्या दबावामुळे तुम्हाला अपेक्षित असं चांगलं काम तुम्ही करू शकणार नाही. आत्मविश्वासाची कमतरता असेल, ज्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल. बुध हा बुद्धिमत्ता आणि विवेकाचा कारक मानला जातो, त्यामुळे बुधाच्या अस्तामुळे तुम्हाला निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांना या काळात विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. करिअरच्या बाबतीत तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुम्हाला बॉसचं सहकार्य मिळणार नाही, त्यामुळे तुमचं मन उदास राहू शकतं. तुम्हाला काम करावसं वाटणार नाही. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्ही नवीन नोकरीसाठी अर्ज देखील करू शकता.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना बुध अस्ताच्या काळात एकाग्रतेने काम करता येणार नाही. बुध अस्तामुळे कन्या राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात चांगले परिणाम मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक काम करू शकणार नाही, त्यामुळे कामात चुका होऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुम्हाला कामाबद्दल चांगल्या कल्पना सुचणार नाही. तु्म्हाला कामावर अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. निराशेतून बाहेर पडून तुम्हाला सकारात्मक पैलूंकडे लक्ष द्यावं लागेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध अस्ताची स्थिती शुभ ठरणार नाही. कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्याने तुमच्यावरील ताणही वाढू शकतो. काहीवेळा तुम्ही तुमच्या कामावर नाखूष असू शकता. नोकरी सोडण्याचा विचारही तुमच्या मनात येऊ शकतो. तुमच्या कामावरुन काही लोक तुमच्यावर टीका करू शकतात. त्याच वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. तुम्ही तुमची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता, परंतु व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही इतर गोष्टींकडेही लक्ष दिलं पाहिजे.
धनु रास (Sagittarius)
बुध अस्ताचा काळ धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल नसेल. या काळात तुम्ही नोकरी-व्यवसायाशी संबंधित मोठा निर्णय घेऊ नये. कामावर आत्मविश्वासाने काम करत राहा. तुमचा या काळात सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो, त्यामुळे शांतिने काम करा. आत्मविश्वास खचू देऊ नका, तर तुम्ही नोकरी-व्यवसायात टिकाव बनवू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: