Budh Asta 2024 : ज्योतिषशास्त्रात (Astrology) बुध ग्रहाला राजकुमार मानले जाते. बुध हा ज्ञान, विचार करण्याची क्षमता, उत्तम तर्क करण्याची क्षमता आणि उत्तम संवाद कौशल्याचा कारक आहे. बुधाचं मार्गक्रमण सर्व लोकांच्या आर्थिक जीवनावर, करिअर, वाणी, बुद्धिमत्ता आणि संवादावर परिणाम करेल. 8 फेब्रुवारीला बुध मकर राशीत अस्त होणार आहे. कोणत्याही ग्रहाचा अस्त चांगला मानला जात नाही, कारण अस्तामुळे ग्रहाची शक्ती कमकुवत होते.
ग्रहाचा अस्त होत असताना काही राशींच्या जीवनावर याचा शुभ, तर काही राशींच्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो. 8 फेब्रुवारीला बुधाचा अस्त होईल आणि 11 मार्चला बुधाचा उदय होईल. त्यामुळे, बुध मकर राशीत सुमारे 1 महिना अस्त स्थितीत राहील. अशा वेळी, बुध 3 राशींच्या जीवनावर अशुभ परिणाम टाकेल, त्यामुळे या राशीच्या लोकांनी या काळात थोडी काळजी घेणं आवश्यक आहे.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी बुधाची ही स्थिती चांगली नाही, त्यामुळे या काळात मेष राशीच्या लोकांना नशिबाची साथ क्वचितच मिळेल. तुम्हाला काम पूर्ण होण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागेल. कामाच्या ठिकाणी थोडं सावध राहण्याची गरज आहे. तसेच नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. एकाग्रतेचा अभाव आणि बोलण्यात कटुता यामुळे नुकसान होऊ शकतं. तसेच तुमचं लग्न एखाद्या वयस्कर व्यक्तीशी होऊ शकतं. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवासातही नुकसान होऊ शकतं. व्यवसायात तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात.
मिथुन रास (Gemini)
बुधाचा अस्त झाल्याने मिथुन राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या लोकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. कौटुंबिक किंवा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधगिरीने काम करावं, नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला व्यवसायात स्पर्धेला सामोरं जावं लागू शकतं. नोकरदार लोकांनाही फसल्यासारखं वाटू शकतं. या काळात कामाचा ताण राहील, सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात.
सिंह रास (Leo)
बुध अस्त स्थितीत गेल्याने सिंह राशीच्या लोकांचं नुकसान होऊ शकतं. या काळात तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक किंवा व्यवहार विचारपूर्वक करा. नोकरीमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, परंतु त्या विचारपूर्वक स्वीकारा. कामाच्या ठिकाणी थोडं सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्याला मिळू शकतं. घरामध्ये भांडणं आणि तणाव वाढू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: