weather : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. काही भागातं कडाक्याची थंडी पडत आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण आहे तर कुठं जोरदार पावसानं हजेरी देखील लावल्याचं पाहायला मिळत आहे. या अशा वातावरणामुळं पिकांचं नुकसान होत आहे. अनेक भागात कडाक्याच्या थंडीचा तडाखा पिकांना बसला आहे, तर काही भागात अति पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. 

Continues below advertisement

खराब हवामानामुळं टोमॅटो, कोबी, फ्लॉवरसह इतर अनेक पिकांना फटका

ओडिशातील सुंदरगडमध्ये अनेक दिवसांपासून हवामान खराब होते. त्यामुळं बागायती पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. खराब हवामानामुळं टोमॅटो, कोबी, फ्लॉवरसह इतर अनेक पिकांनाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेआधीच पीक काढणी करावी लागत आहे. त्यामुळं कमी दरात पिकांची विक्री करावी लागत आहे.

टोमॅटो पिकाचे सर्वाधिक नुकसान

खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी काढणीस उभी असलेली पिकंही खराब झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टोमॅटो पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पावसामुळं टोमॅटो खराब होऊ लागला आहे. तर कोबी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. हवामानामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची उरलेली पिकेही कवडीमोल भावाने विकली जात आहेत. उरलेले पीकही खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

Continues below advertisement

शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 

शेतकऱ्यांना त्यांचे टोमॅटोचे पीक 10 रुपये किलो दराने विकावे लागत आहे. त्याचबरोबर कोबीचे दरही 15 रुपये किलोवर आले आहेत. अनेक शेतकऱ्यांना त्यांचे कोबीचे पीक कमी भावातही विकता येत नाही. याशिवाय, करवंद, बाटली, कडबा यांसह इतर पिकांवरही हवामानाचा परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे शेतकरी नियोजित वेळेपूर्वी पिकांची काढणी करत आहेत.  पिकांच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. टोमॅटोचा दर 10 ते 20 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर फ्लॉवरचे भावही जवळपास 50 रुपयांवरुन 15 ते 20 रुपयांपर्यंत घसरले आहेत. यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

कुठं थंडीचा कडाका तर कुठं पावसाची हजेरी, देशातील हवामानाचा अंदाज काय?