Continues below advertisement

Baba Vanga Predictions 2026 : ती पाहू शकत नव्हती... पण तिला सगळं काही दिसत होतं. भविष्यातले अनेक अंदाज तिनं बांधले. तिच्या कित्येक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या. अनेकदा तिनं सांगितलं तसंच घडलं. प्रिन्सेस डायनाचा मृत्यू. अमेरिकेवरचा 9/11 चा हल्ला. जपानमधली त्सुनामी... या आणि अशा शेकडो घटना तिनं आधीच पाहिल्या होत्या. ती होती बाबा वेंगा.... आणि आता तिची नजर आहे 2026 वर.

Who Was Baba Vanga : कोण होती बाबा वेंगा?

1911 मध्ये युरोपच्या बल्गेरियात जन्मलेली वेंगेलिया पांडेवा गुशतेरोव्हा म्हणजेच बाबा वेंगा. 12 व्या वर्षी एका वादळात तिची दृष्टी गेली. पण दृष्टी गेली तरी तिला एक असाधारण वरदान मिळालं. तिच्या म्हणण्यानुसार तिला भविष्यातलं दिसत होतं आणि लोक तिच्यावर विश्वास ठेऊ लागले. हळूहळू तिचे अनुयायी तयार झाले.

Continues below advertisement

बाबा वेंगाच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार, तिनं 5079 सालापर्यंतच्या भविष्यवाण्या केल्या आहेत. म्हणूनच नव्या वर्षात अर्थात 2026 विषयी तिनं काय सांगून ठेवलंय हा उत्सुकतेचा विषय आहे.

Baba Vanga Predictions : 2026 आणि बाबा वेंगाची भविष्यवाणी

 

Baba Vanga News : बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या : सत्य की कल्पना?

याआधी बाबा वेंगानं केलेल्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या होत्या. पण काही भाकितं खोटी ठरली. तिनं सांगितलं होतं 2010 मध्ये युरोप ओस पडेल. पण वास्तवात असं काही घडलं नाही. "अमेरिकेचा शेवटचा राष्ट्राध्यक्ष असेल ब्लॅक प्रेसिडेंट" असं बाबा वेंगानं म्हटलं होतं. तिनं भविष्यवाणी केली होती की बराक ओबामा अमेरिकेचा शेवटचे अध्यक्ष असतील. त्यानंतर अमेरिका विघटित होईल, पण वास्तवात असं घडलं नाही. त्यानंतर ट्रम्प आणि बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले.

आता काही लोक म्हणतात की बाबा वेंगाच्या नावाने पसरवलेल्या अनेक भविष्यवाण्या या खऱ्या नसून काल्पनिक आहेत. बाबा वेंगाची कोणतीही भविष्यवाणी लिखित स्वरुपात तिच्याकडे नव्हती. सर्वकाही मौखिक होतं. यासंदर्भात अधिकृतपणे कोणतेही दस्तऐवज नाहीत. 1996 ला बाबा वेंगाच्या निधनानंतर अनेकांनी या भविष्यवाण्यांचे अनेक अर्थ लावले. काही भविष्यवाण्यांचे अर्थ भाषांतराच्या गोंधळामुळेही बदलले. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता तपासणं कठीण आहे...

Baba Vanga बाबा वेंगाचं गूढ

बाबा वेंगा जगासाठी आजही एक गूढ आहे. तिनं केलेली काही निरीक्षणं बरोबर असतीलही पण ती अचूक विज्ञान नव्हे. अशा भविष्यवाण्यांकडे अंधश्रद्धेनं नव्हे तर केवळ जिज्ञासेनं आणि तार्किक पद्धतीनं पाहणंच योग्य ठरेल.