Baba Vanga Prediction : जगात असे बरेच महान भविष्यकार आहेत, ज्यांनी येणाऱ्या अनेक दशकांची भविष्यवाणी (Prediction) केली आहे. यातील बऱ्याच भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या देखील झाल्या आहेत. 2024 वर्षाबद्दल देखील अशा अनेक भविष्यवाण्या केल्या गेल्या आहेत, यातील अनेक भविष्यवाण्या घाबरवणाऱ्या आहेत. कारण त्या विनाश, युद्ध, राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट इत्यादींशी संबंधित आहेत. पण यातील एक भविष्यवाणी खूप आनंददायी आहे आणि ती खरी ठरली तर ती मानव जातीसाठी मोठी देणगी ठरणार आहे. 


बाबा वेंगा यांनी 2024 साठी केलं महत्त्वाचं भाकीत


बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी 2024 बद्दलचं हे आनंददायी भाकीत  अनेक वर्षांपूर्वी केलं होतं. बाबा वेंगा हे एक महान भविष्यकार आहेत, त्यांनी दशकांपूर्वी केलेली अनेक भाकितं आत्तापर्यंत खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांनी 2024 साठी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाणींपैकी एक वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. बाबा वेंगांच्या म्हणण्यानुसार, कॅन्सर आणि अल्झायमरसारख्या धोकादायक आजारांवर 2024 साली उपचार मिळू शकतात. आतापर्यंत या आजारांवर उपचार करणं अशक्य होतं आणि दरवर्षी केवळ देशातच नव्हे, तर जगभरात लाखो-करोडो लोक या आजारांना बळी पडतात. परंतु आता बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरल्यास मानवाला मोठा फायदा होईल. 


2024 ची भयावह भविष्यवाणी 


बाबा वेंगा यांनी 2024 या वर्षासाठी अनेक धोकादायक भविष्यवाण्या केल्या आहेत, ज्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या, ग्लोबल वार्मिंग, जैविक शस्त्रांचा वापर, सायबर अटॅक यांचा समावेश आहे. याशिवाय बाबा वेंगाच्या मते, 2024 मध्ये जगाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.


कोण आहेत बाबा वेंगा?


बाबा वेंगा यांची 'बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस' अशी ओळख आहे. 3 ऑक्टोबर 1911 रोजी बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांची वयाच्या बाराव्या वर्षी एका रहस्यमय वादळात दृष्टी गेली. यानंतर त्यांनी जगातील विविध देश, सामाजिक-आर्थिक आणि जागतिक घडामोडीबाबत अनेक भाकितं केली, जी नंतर खरी ठरली. त्यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट यासह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या पुढे खऱ्या ठरल्या.


टीप : बल्गेरियातील बाबा वेंगा यांची भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. या भविष्यवाणीचं एबीपी माझा समर्थन करत नाही.


हेही वाचा:


Shani Dev : 2024 मध्ये शनि बदलणार नाही चाल; 'या' 5 राशींच्या लोकांना होणार धनलाभ, संकटं होतील दूर