Baba Vanga : जगातील प्रसिद्ध भविष्यकारांपैकी एक असलेले बल्गेरियनमधील बाबा वेंगा यांनी 2023 या वर्षासाठी एक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी केलेली ही भविष्यवाणी भारतासह जगाविषयी धोकादायक आणि लोकांना घाबरवणारी आहे.


नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत बाबा वेंगा यांची भविष्यवाणी लोकांची झोप उडवत आहे. आत्तापर्यंत 2022 बाबत त्यांनी केलेले दोन अंदाज खरे ठरले आहेत. बाबा वेंगाच्या भविष्यानुसार 2023 हे वर्ष भारतासाठी कसे असेल आणि काही घडणार आहे हे  जाणून घेऊया.  


Baba Vanga :  बाबा वेंगाचे भारताबद्दलचे भविष्य


भारताबाबत बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये सौर त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे लोकांचे आणि पैशाचे मोठे नुकसान होणार आहे. याशिवाय आशिया खंडातील अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होणार असून त्याचा परिणाम भारतावरही होणार आहे, असे बाबा वेंगा यांनी सांगितले आहे.  
 
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2023 मध्ये एक विनाशकारी सौर वादळ येईल. यादरम्यान सूर्यातून निघणाऱ्या ऊर्जेच्या स्फोटातून निघणारी धोकादायक किरणे पृथ्वीवर पडतील, जी अब्जावधी अणुबॉम्बसारखी विनाशकारी असू शकतात.
 
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2023 मध्ये पृथ्वीवर एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. या घटनेच्या प्रभावामुळे पृथ्वीच्या कक्षेत बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम अत्यंत घातक असेल. खूप मोठ्या संख्येने लोक मारले जातील.


Baba Vanga :  कोण आहेत बाबा वेंगा?


बाबा वेंगा हे बल्गेरियाचे रहिवासी आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. बाबा वेंगा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपीट प्रदेशात व्यतीत केले. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला आहे. त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते. पुढे ते बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाले. 11 ऑगस्ट 1996 रोजी जगाचा निरोप घेण्यापूर्वी बाबा वेंगा यांनी 5079 पर्यंतचे भाकीत केले होते.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या


Gemini Weekly Horoscope : मिथुन राशीच्या लोकांना 'या' आठवड्यात मिळेल भाग्याची पूर्ण साथ, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य