Uddhav Thackeray on Shinde Group: शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आता मोर्चा उघडला आहे. सरकारमधील एकामागून एक अशा तीन मंत्र्यांवर मविआ (Maha Vikas Aghadi)  नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र शिंदे गटातील (Shinde Group) मंत्र्यांचे हे प्रकरण बाहेर काढण्यात भाजपचा (BJP) तर हात नाही ना? असा प्रश्न आता ठाकरे गटाचे नेते करत आहे. यावरच बोलताना आता स्वतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत की, ''ज्या प्रकारे त्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत, यांना भाजप तर टाचणी लावत नाही ना? ही बरोबर त्याच मंत्र्यांची कशी येत आहे. हा विचार त्यांनी केला पाहिजे.'' ते म्हणाले, ''निवडणुकीला अजून अवकाश आहे, असं आपण मानतो. माझ्या मते येत्या वर्ष भरात निवडणूक होऊ शकतात.''

  


Maharashtra Karnataka Border Dispute: 'कर्नाटकसाठी महाराष्ट्र तोडण्याचं कारस्थान'


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत की, निवडणुकीला अजून अवकाश आहे, असं आपण मानतो. माझ्या मते येत्या वर्ष भरात.. कर्नाटकसाठी महाराष्ट्र तोडण्याचं कारस्थान, गुजरातची महाराष्ट्रातील उद्द्योग पळवण्यात कारस्थान करण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, ''मध्यवधी निवडणूक लागली तर भाजप चिन्हावर लढणार नाही, हे त्यांनी (शिंदे गटाने) सांगावं. ते म्हणाले, रोज एक घोटाळा बाहेर येतोय. आपले घोटाळे लपवण्यासाठी हे तिकडे गेलेत.'' यावेळी  बोलताना ते म्हणाले आहेत की, ''पंतप्रधानांची भावना प्रामाणिक असले तरी आजूबाजूला बसणारे तसे नाही.''


पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत की, नागपुरात कस्तुरचंद पार्कवर सभा घेऊ. पूर्वी सभा घेतली होती त्यावेळी आठ दहा हजार लोक येतील, असा अंदाज पोलीस व्यक्त करत होते. मात्र लोकांनी खूप प्रतिसाद दिला. मला नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. ते म्हणाले, संजय राऊत तुरुंगात होते, आमिष दाखवण्यात आले. मात्र ते सोबत आहे. त्यांना  शांत झोप लागते. माझ्या झाडाची मूळ आता सोबत आहे. ते म्हणाले, पूर्व विदर्भाची माफी मागतो. युतीत हा भाग सोडला होता. मात्र आता नाही.


Uddhav Thackeray: ''बाबरी वेळेस आपली चूक झाली''


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, आपल्याच लोकांनी जास्त वार केले. बाबरी वेळेस आपली चूक झाली. त्यावेळी शिवसेनप्रमुखनी सांगितले की, बाबरी शिवसैनिकांनी पाडली तर अभिमान आहे. त्यानंतर देशात अनेकजण शिवसेनेत (Shiv Sena) येण्यास तयार होते. मात्र हिंदू व्होट बँकेला छेद नको म्हणून शिवसेनाप्रमुखानी नकार दिला.