Astrology, Zodiac Sign: स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. ती जर सुज्ञ, समंजस असेल तर घरामध्ये शांतता नांदते. सासू - सुनेचं नातं हे फार संवेदशील असतं. पण सतत जर दोघींमध्ये भांडण होत असेल तर दोघींचे मानसिक स्वास्थ्य बिघडतं. ज्याचा परिणाम घरातील इतर सदस्यांवरही होतो. त्यामुळं या नात्याबाबत गंभीर आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. राशीनुसार तुम्ही तुमच्या सासूचा स्वभाव जाणून घेऊ शकता. कोणत्या राशींच्या सासू रागीट स्वभावाच्या असतात. तसेच त्यांच्यासोबतचा वाद टाळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हे जाणून घेऊयात. 


मेष- (Aries)
मेष राशीची सासू स्वभावानं अतिशय कडक आणि शिस्तप्रिय असतात. त्यांना आळस आवडत नाही. प्रत्येक गोष्टी वेळतचं व्हाव्यात अशी त्यांची इच्छा असते. घरातील तिच्या प्रतिमेबद्दल ती खूप जागरूक आहे. अशा परिस्थतीत त्यांच्याशी जुळवून घेणं, थोडं अवघड जात. पण काही काळानंतर परिस्थिती हळहळू सुधारते. मेष राशींच्या सासू आपल्या सूनेला खूप जीव लावतात. परंतु, काही कारणांमुळं त्यांच्या वाद निर्माण होतो. या राशींतील सासूचं नाव ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो पासून सुरू होते. 


कन्या- (Virgo)
कन्या राशी असलेल्या सासू मोकळ्या मनाच्या असतात. त्या नवीन कल्पना आणि विचारांना प्रोत्साहन देतात. त्या आपल्या सूनांशी नको त्या गोष्टींवरून वाद घालत नाहीत.  प्रत्येक निर्णय परिस्थिती समजूनच घेतात. कामात सूनांना हातभार लावायला मागे पुढे पाहत नाही. सुनेचे कौतुक करण्यातही ती मागे राहत नाही. त्यांचं नाव  धो, पा, पि, पू, ष, न, ठ, पे आणि पो ने सुरू होते. 


धनु- (Sagittarius)
धनु राशींच्या सासू खूप गंभीर असतात. त्या अधिक धार्मिक आहेत. ती आपल्या प्रतिमेबद्दल खूप सावध असतात. तसेच शिस्तप्रियही प्रिय आहेत. त्यामुळं समन्वय साधताना काही आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यांना चांगलं जेवण आणि प्रवास करायला आवडतो. ज्यांचं नाव ये, यो, भा, भी, भू, धा, फा, धा, भे या अक्षरांनी सुरू होते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)


हे देखील वाचा-