Black Dress On Sunday : आजचा दिवस रविवार (Sunday). खरंतर रविवार हा दिवस सूर्यदेवाला (Sun) समर्पित आहे. हिंदू धर्म मान्यतेनुसार, सूर्याला फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. असं म्हणतात की, पहाटे सूर्यदेवाची पूजा केल्याने तसेच दर्शन घेतल्याने आपल्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. तसेच, आपल्या जीवनात यश प्राप्त होते. 


खरंतर, दररोज सूर्यदेवाला पाणी वाहणं शुभ मानले जाते. पण, ज्योतिष शास्त्रात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. यामधलाच एक म्हणजे, रविवारी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत. असं म्हणतात की, रविवारी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. यामागे नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात. 


अशुभ परिणाम मिळतात


खरंतर, रविवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणं अशुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य हा उष्ण हा आणि शुष्क असा ग्रह आहे. तर, सूर्य देव हा प्रकाश देतो आणि आपल्या आयुष्यात नवीन ऊर्जा भरतो. तर, शनी देव हा कर्मफळ दाता आहे. शनीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी लोक काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. तसेच, मान्यतेनुसार सूर्य आणि शनी यांच्यात चांगले संबंध नाहीयेत. त्यामुळे, रविवारी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने ग्रह दोष निर्माण होऊ शकतात. ज्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. 


2. कुंडलीतील स्थिती कमजोर असते 


सूर्याचा रंग लाल किंवा सोनेरी, तांबूस रंगाचा असतो. सूर्य हा ऊर्जेचा प्रतीक आहे. तर, शनीचा आवडता रंग काळा मानण्यात आला आहे. अशातच रविवारी काळे कपडे परिधान केल्याने सूर्य देव नाराज होतात. ज्यामुळे तुमच्या कुंडलीतील स्थिती कमजोर होऊ शकते. यामुळे व्यक्तीच्या जीवनात आत्मविश्वास कमी होतो. तसेच, तणावाची परिस्थिती उद्भवते. यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत. 


3. राहुचा असतो प्रचंड प्रभाव


काळ्या रंगाला नकारात्मकतेचं प्रतीक देखील मानण्यात आलं आहे. तर, राहुला सुद्धा काळ्या रंगाशी जोडण्यात आलं आहे. त्यामुळे रविवारी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने राहु ग्रहाचा प्रभाव पडतो. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक समस्या वाढू शकतात. यासाठीच ज्योतिष शास्त्रात रविवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं अशुभ आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या