Buldhana Farmer News : औषधांची फवारणी (Spraying drugs) केल्यानंतर दोन एकर क्षेत्रातील फुलकोबी खराब (Cauliflower) झाल्याची घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात घडली आहे. कृषी केंद्र संचालकाने वैधता संपलेली औषधे दिल्यानं शेतकऱ्याच्या फुलकोबीचं नुकसान झालं आहे. यामध्ये शेतकऱ्याचे 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकरी असलेल्या पती-पत्नीनं आमरण उपोषण (fast unto death) सुरु केलं आहे. चार दिवसांपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर त्यांचं उपोषण सुरु आहे.


पंचनामा केला मात्र, नुकसान भरपाई मिळाली नाही


बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील कासारखेड येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी दादाराव वानखेडे आणि त्यांच्या पत्नीने जिल्हाधिकारी कर्यालयसमोर मागील चार दिवसापासून आमरण उपोषण सुरु केलं आहे. मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. दादाराव वानखेडे यांनी त्यांच्या शेतातील दोन एकर क्षेत्रात फुलकोबीची लागवड केली होती. मात्र, त्यावर फवारणी करतेवेळी दुकानदारांनी त्यांना वैधता संपलेले औषधी दिल्यानं फुलकोबी काळी पडून खराब झाली आहे. परिणामी त्यांचे जवळपास 7 लाखांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने पंचनामा केला आहे. वरिष्ठांकडे अहवाल सादर देखील केलाय. मात्र त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे.


फुलकोबी लावल्यानंतर फवारणी केली होती. त्यानंतर फुलकोबी पूर्ण खराब झाली होती अशी माहिती शेतकऱ्याने दिली आहे. माझ्या फुलकोबीच जवळपास सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे.  


महत्वाच्या बातम्या:


भंडाऱ्यातील महिला शेतकऱ्याची भन्नाट आयडिया! ड्रोनद्वारे केली कीटकनाशक फवारणी