Astrology : ज्योतिषशास्त्रात मेष ते मीन राशीपर्यंत एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. प्रत्येक राशीची स्वतःची खासियत असते. मुलींच्या बाबतीतही असेच सांगितले जाते.
मेष : ज्या मुलींची राशी मेष आहे त्यांच्यामध्ये मंगळाचा प्रभाव दिसून येतो. असे म्हणतात की मेष राशीच्या मुली उत्साही असतात. प्रत्येक काम पूर्ण उत्साहाने करतात. यामुळेच त्या वाईट काळातही पतीसाठी खऱ्या मित्राची भूमिका बजावते. या मुली सासू-सासऱ्यांच्याही लाडक्या असतात.
सिंह : सिंह राशीच्या मुलींमध्ये नेतृत्वगुण दिसून येतो, त्या लग्नापूर्वी आपले घर आणि लग्नानंतर सासरच्या मंडळींना सांभाळून घेतात. या मुली पतीसाठी चांगल्या मार्गदर्शक असल्याचे सिद्ध होते. त्या संकटांना धैर्याने सामोरे जातात. वेळ आल्यावर स्वतःला पुढे करून आव्हानांशी मुकाबला करतात, पतीवर येणाऱ्या प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात.
धनु : ज्या मुलींची धनु रास असते, त्या प्रत्येक काम खूप गांभीर्याने घेतात. कधीकधी त्यांच्या कामात दोष शोधणे कठीण होते. त्या प्रत्येक जबाबदारी पार पाडतात. पडद्याआड राहूनही त्या पतीला सर्व कामात मदत करतात. पैसे वाचवण्यात त्या पटाईत असतात. त्यांच्या याच गुणांचा पतीला अभिमान वाटतो. हिशेबाच्या बाबतीत त्या खूप पारंगत असतात.
मीन : या राशीच्या मुली खूप हुशार असतात. त्या प्रत्येक काम अतिशय सुंदर पद्धतीने करतात. ते खूप कलात्मक असतात. येऊ घातलेल्या धोक्याची जाणीव करून देण्याची क्षमताही त्यांच्याकडे असते. यामुळे त्या स्वतःला सर्व त्रासांपासून वाचवू शकतात. पतीसोबतच त्या सासरच्या घरातील सर्व सदस्यांची काळजी घेतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :