Astrology: बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांच्या भविष्यवाण्या अनेकदा खऱ्या सुद्धा ठरल्या आहेत. त्यांनी 2025 सालाबद्दल अनेक भाकितंही केली आहेत, त्यापैकी एका भाकितात त्यांनी सांगितले आहे की, या वर्षी कोणते लोक श्रीमंत होणार आहेत? बाबा वेंगा आता या जगात नसले तरी, तरी त्यांच्या हयातीत, त्यांनी येणाऱ्या वर्षांबद्दल अनेक मोठ्या भाकिते केली होती, ज्यात नैसर्गिक आपत्तींपासून ते युद्धांपर्यंतच्या गोष्टींचा समावेश होता. बाबा वेंगाच्या भाकितानुसार, 2025 मध्ये श्रीमंत होणारे लोक कोण आहेत? जाणून घेऊया. त्यांनी अशा 4 राशींबद्दल सांगितले आहे, ज्यामध्ये तुमच्या राशीचे नाव आहे का? एकदा पाहाच..
वृषभ
बाबा वेंगा यांनी वृषभ राशीच्या लोकांबद्दल सांगितले आहे की 2025 मध्ये या राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. या राशीचे लोक त्यांच्या दृढनिश्चय आणि धैर्यासाठी ओळखले जातात. या वर्षी ग्रह आणि नक्षत्रांनुसार, देवी लक्ष्मी या राशीच्या लोकांवर कृपा करू शकतात आणि ते श्रीमंत होऊ शकतात.
सिंह
बाबा वेंगा या यादीत सिंह राशीच्या लोकांचाही समावेश केला आहे ज्यांचा स्वामी सूर्य आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता चांगली असते. बाबा वेंगा म्हणाले की, या वर्षी सिंह राशीच्या लोकांचे तारे चमकणार आहेत. त्यांना फॅशन, मनोरंजन यासारख्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता जास्त असते. या वर्षी सिंह राशीचे लोक नवीन करार करू शकतात, त्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल.
वृश्चिक
बाबा वेंगाने 2025 मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावर राहील असे भाकीत केले आहे. वृश्चिक राशीवर प्लूटोचे राज्य असते, जे पाण्याचे चिन्ह आहे. या राशीच्या लोकांचा उत्साह खूप जास्त असतो, त्यामुळे या वर्षी त्यांच्या कारकिर्दीत वाढ होऊ शकते आणि ते श्रीमंत होऊ शकतात. या राशीच्या लोकांना नवीन नोकरी आणि व्यवसायासाठी चांगल्या संधी मिळतील. त्यांना फक्त योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
मकर
बाबा वेंगाने केलेल्या भाकितानुसार, पुढील राशी मकर आहे, ज्याचा स्वामी शनि आहे.या वर्षी शनिदेव मीन राशीत भ्रमण करत आहेत, तर मकर राशीच्या लोकांसाठी शनिदेव चांगले परिणाम देतील. अशा परिस्थितीत, या वर्षी मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होतील आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या चांगल्या संधी मिळतील. मकर राशीच्या लोकांना वित्त, रिअल इस्टेट किंवा तंत्रज्ञान व्यवसायात यश मिळू शकते.
हेही वाचा..
Akshay Tritiya 2025: यंदा अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी- कुबेराचा खजिना उघडणार! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार, दुहेरी राजयोगाचा अद्भुत योगायोग
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)