Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, येणाऱ्या दिवसात सूर्य, मंगळ आणि केतू एकत्र आल्याने जे “भस्म राजयोग”, “रुद्र योग” आणि “अग्नी राजयोग” तयार होतात, ते अत्यंत शक्तिशाली, परिवर्तनशील, आणि धोकादायक सुद्धा असतात. हे योग सामाजिक, राजकीय, आणि नैसर्गिक स्तरावर मोठे बदल घडवू शकतात. याचा राशींनुसार कसा परिणाम होतो ते जाणून घेऊयात. 

कोणते योग तयार होणार आहेत?

सूर्य + मंगळ + केतू  = भस्म राजयोग
 
भस्म राजयोग – जुनी व्यवस्था नष्ट करून नवीन व्यवस्थेचा प्रारंभ
रुद्र योग – तात्काळ, कठोर, आणि निर्णायक कारवाई
अग्नी योग – अपघात, हिंसाचार, विस्फोट, युद्धाची शक्यता

जागतिक स्तरावर परिणाम :

राजकीय अस्थिरता
एखाद्या देशात सत्ता उलथापालथ, अचानक राजीनामे
 
सीमेवर तणाव / युद्धजन्य वातावरण
भारत-पाक, इराण-इस्राईल वगैरे देशांमध्ये तणाव
 
नैसर्गिक आपत्ती
ज्वालामुखी, भूकंप, जंगलातील आग, दुष्काळ किंवा पूर
 
आर्थिक बाजारात घसरण / अचानक तेजी
शेअर मार्केट मध्ये धक्कादायक चढ-उतार
 
मानसिक आरोग्याचा त्रास वाढणे
लोकांमध्ये चिडचिडेपणा, नैराश्य वाढणे

या काळात कोणत्या राशींनी राहावे सावध?

मेष रास (Aries Horoscope)

मंगळ कारक राशी, क्रोध आणि अपघाताचा धोका
वाहन हळू चालवा, वाद टाळा

कर्क रास (Cancer)

चतुर्थात केतू, घरगुती तणाव
आई-वडिलांशी वाद टाळा

सिंह रास (Leo)

सूर्य राशी स्वामी – अहंकार व सरकारी त्रास
अहंकार बाजूला ठेवावा

धनु रास (Sagittarius)

केतू च्या प्रभावामुळे मानसिक अस्थिरता
मेडिटेशन, शांतता आवश्यक

मकर रास (Capricorn)

शनीच्या साडेसातीचा दबाव, उग्र निर्णय चुकीचे ठरू शकतात

या काळात लाभ मिळवणाऱ्या राशी :

वृषभ रास (Taurus)

प्रतिस्पर्ध्यांवर विजय

कन्या रास (Virgo)

गुप्तशक्ती आणि अंतरज्ञानाचा लाभ

मीन रास (Pisces)

आध्यात्मिक शक्ती, गूढ क्षेत्रात यश

सावधगिरी आणि उपाय :

1. सूर्याला रोज अर्घ्य द्या – सकाळी 8 वाजेपर्यंत
2. मंगळवार उपवास – चणाडाळ आणि गूळाचा नैवेद्य
3. केतू शांतीसाठी दुर्गा सप्तशती / गणपती स्तोत्र वाचन
4. “ॐ रुद्राय नमः” 108 वेळा जप करा दररोज
5. हनुमान मंदिरात नारळ व लाल फूल अर्पण करा
 
डॉ. भूषण ज्योतिर्विद
 
हे ही वाचा :