Astrology : वैदिक शास्त्रानुसार, शुक्र आणि सूर्याच्या संयोगाने शुक्रादित्य योग तयार होतो. आज म्हणजेच (14 मे रोजी) सूर्य वृषभ राशीत (Taurus Horoscope) प्रवेश करणार आहे. 19 मे पर्यंत शुक्रही वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे शुक्रादित्य योग तयार होतोय. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगामुळे अनेक राशींच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. या राशींना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांना नोकरीत चांगलं यश मिळेल. शिक्षण क्षेत्रात तुमची चांगली प्रगती होईल. तुमची आर्थिक बाजू चांगली राहील. तुम्ही केलेल्या कामाचं सर्वजण कौतुक करतील. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्ही आनंदी असाल. तुमच्या मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
व्यवसायासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर ती फायद्या ठरू शकते. आर्थिक लाभाच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्ही उत्साही असाल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नोकरी व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा होईल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. जोडीदाराबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
तुमच्या जीवनात आनंद आणि प्रगती होईल. जे तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नोकरी मिळेल. या काळात तुमच्या पदोन्नतीची शक्यता आहे. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी सगळे तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
जे तरूण स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना चांगलं यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. तुम्ही जे काम मेहनतीने कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :