Astrology : मुंगूसचं (Mongoose) दिसणं फार शुभकारक मानलं जातं असं अनेकदा आपण लोकांना बोलताना ऐकलं आहे. कोणत्याही कार्यासाठी जेव्हा आपण घराबाहेर पडतो आणि तेव्हा रस्त्यात जर मुंगूस दिसला तर तो शुभ मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार,  मुंगूसला भगवान कुबेराचं वाहन मानलं जातं.


जर तुम्हालाही मुंगूस दिसत असेल तर तो तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. जर मुंगूस सकाळी दिसला तर तुमचा दिवस अगदी छान जाण्याचा हा संकेत आहे. यामुळे लवकरच तुमचं नशीब पालटणार आहे असा याचा अर्थ होतो. 


मुंगूस सूर्याचं प्रतीक 


ज्योतिष शास्त्रानुसार, मुंगूसला सूर्याचं प्रतीक मानलं जातं. मुंगूस तुमचं आयुष्य सूर्यासारखं तेजस्वी बनवतो. असं देखील सांगण्यात आलं आहे की, सकाळत्या वेळी जर तुम्हाला मुंगूस दिसत असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती व्यक्ती मालामाल होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही सकाळी लवकर उठताच जर तुम्हाला घरात मुंगूसचं दर्शन दिसल असेल तर याचा अर्थ तुम्ही लवकरच मालामाल होणार आहात असा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मुंगूसचा थेट संबंध जमिनीतील दडलेल्या खजिन्यांशी आहे. सकाळ सकाळ मुंगूसाचं दिसणं व्यक्तीला गुप्त धन मिळवून देण्याचा संकेत देतं. 


भगवान कुबेराचं वाहन - मुंगूस 


हिंदू धर्म ग्रंथानुसार, मुंगूसला धन-संपत्तीचा कारक देवता भगवान कुबेराचं वाहन मानण्यात आलं आहे. मुंगूसाचं दिसणं फार शुभकारक मानलं जातं. जर तुम्ही कुठे जात असताना रस्त्यात जर तुम्हाला मुंगूस दिसला तर याचा अर्थ ज्या कामासाठी तुम्ही जात आहात ते काम शुभकारक होणार आहे. मग ते कोणतंही कार्य असो त्याचे परिणाम तुम्हाला शुभच मिळतील अशी मान्यता आहे. 


शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मुंगूसाचं दर्शन होणं म्हणजे भगवान कुबेराचं दर्श करण्यासारखं आहे. मुंगूसला गुप्त धनाचं प्रतीक मानण्यात आलं आहे. मुंगूसाचं दिसणं सौभाग्याचा संकेत आहे. तसेच, मुंगूस हा बुद्धी, यश आणि धन-संपत्तीचं प्रतिनिधित्व करतो. यामुळे मुंगूसाचं दिसण फार शुभकारक मानलं जातं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )


हे ही वाचा :


Shravan Vastu Tips : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...