Motivational Quotes : माणसाने एकदा आपले ध्येय निश्चित केले की ते साध्य केल्याशिवाय थांबू नये. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा, असे सांगितले जाते. 


"ध्येय गाठण्यासाठी कधी कधी अडथळ्यांना सामोरे जावे लागते. आव्हानांना कसे सामोरे जातो यावरही माणसाचे कौशल्य आणि क्षमता अवलंबून असते. माणसाने अडथळे आल्यावर खचून जाऊ नये. परंतु, या अडथळ्यांना आव्हान समजून ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ध्येय पूर्ण करण्यात अडचण येऊ लागते, त्यावेळी या गोष्टीही लक्षात ठेवा, असे  यशाची गुरुकिल्लीमध्ये सांगण्यात आले आहे. 


"यशाची गुरुकिल्ली सांगते की, मोठे ध्येय साध्य करताना समस्यांना तोंड देणे स्वाभाविक आहे. या समस्यांना घाबरू नका. समस्याही सोडवता येतात. परंतु, संकट आल्यावर आत्मविश्वास खचू देऊ नये. आत्मविश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास टिकला तरच सर्वात मोठा अडथळा देखील दूर होतो. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास असणे महत्त्वाचे मानले जाते."


निराश होऊ नका
यशाची गुरुकिल्ली सांगते की, ध्येय गाठण्यात येणारे अडथळे कधीकधी निराशा देखील देतात. परंतु लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की जेव्हा अडथळे येतात तेव्हा निराशेचे वर्चस्व असू नये. जेव्हा निराशा वाढते तेव्हा व्यक्तीच्या कार्य क्षमतेवर परिणाम होतो. ध्येय गाठायचे असेल तर कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.


संयम कधीही गमावू नका
यशाची गुरुकिल्ली सांगते की, कितीही अडथळे आणि संकटे आली तरी संयम कधीही सोडू नये. अडथळे असतानाही पूर्ण शक्तीने प्रयत्न सुरू ठेवा आणि यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहा. ध्येय साध्य करण्यासाठी संयम हे एक उत्तम शस्त्र आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की, कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नये.


महत्वाच्या बातम्या


Jupiter Transit 2022 : मीन राशीत  होणार गुरु राशीचे परिवर्तन, 'असे' होणार फायदे


Saturn transformation :धनु राशीला साडेसात वर्षांनंतर मिळणार दिलासा, इतर दोन राशींनाही मिळणार मुक्ती


Navratri 2022 : नवरात्रीत 'ही' चूक कधीही करू नका, रागावू शकते दुर्गा माता


Libra Monthly Horoscope: तूळ राशींच्या लोकांना एप्रिल महिन्यात कोणती काळजी घेण्याची गरज? येथे पाहा संपूर्ण राशीभविष्य