Astrology Panchang Yog 9 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 9 मार्चचा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आज फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी रवियोगासह (Yog) अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्या जवळच्या मित्राबरोबर गाठीभेटी होतील. तसेच, कुटुंबियांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. जे लोक बिझनेस करतात त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचा चांगला विकास झालेला दिसेल. तसेच, आज तुम्ही तुमच्या आवडीचा आहार घेऊ शकता.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकता. तसेच, जर तुम्हाला नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज जवळच्या व्यक्तीशी तुमच्या गाठीभेटी होतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, वैवाहिक जीवन देखील सुरळीत चालणार आहे. भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घ्याल. तुमचे एखादे रखडलेले काम देखील पूर्ण होईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तसेच, सामाजिक कार्यात तुम्ही सक्रिय असाल. तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, सकारात्मक दृष्टीकोन राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :