Astrology Panchang Yog 4 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसा, आज 4 ऑक्टोबर 2025 चा दिवस आहे. म्हणजेच, आजचा दिवस शनिवार आहे. हा दिवस शनिदेवासाठी (Shani Dev) आपण समर्पित कतरतो. तसेच, आजच्या दिवशी शनिला प्रसन्न करण्यासाठी, केलेल्या शिक्षेची माफी मागण्यासाठी भक्त शनि मंदिरात जातात. तसेच, शनिची पूजा करतात. आज अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. त्याचबरोबर, आज प्रदोष व्रताचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्राने देखील आज कुंभ राशीत (Aquarius) प्रवेश केला आहे. ही शनिचीच रास आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. आजच्या दिवशी सुनफा योगासह (Yog) द्विपुष्कर योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायी असणार आहे. आज तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. या संधीचं तुम्ही सोनं कराल. तसेच, जे लोक वाहन किंवा दागिन्यां संबंधित क्षेत्रात काम करतायत त्यांच्यासाठी आज चांगल्या कमाईचा दिवस आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भात देखील तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. तसेच, दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. आज दिवसभरात तुम्हाला पार्टनरकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुम्ही आज दिवसभर प्रसन्न असाल. आर्थिक स्थिती चांगली असेल तसेच, आरोग्याच्या बाबतीतही चिंता करु नका. शनि देवाची कृपा तुमच्यावर असणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, भौतिक सुख-संपत्तीचा तुम्ही लाभ घ्याल. आज तुमची समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींशी भेटीगाठी होतील. त्यांचे विचार तुम्हाला पटतील. तसेच, तुम्हाला तुमच्या कामातून आनंद मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या नजरेत येण्यासाठी तुम्हाला तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील. तसेच, सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. कल्पनाशक्तीला वाव मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)