Astrology Panchang Yog 4 March 2025 : आज 4 मार्च म्हणजेच, मंगळवारचा दिवस. आज भगवान हनुमानाची कृपा अनेक राशींच्या लोकांवर असणार आहे. आज चंद्राचा मेष राशीत प्रवेश होऊन शुभ भरणी नक्षत्रसुद्धा असणार आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी इंद्र योगासह (Yog) अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. नोकरी, व्यवसायासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. तसेच, आज तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करता येईल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा चांगला पाठिंबा पाहायला मिळेल. आज तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदाक ठरणार आहे. आज तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्ही अनेक मोठ्या योजना आखाल. तसेच, तुम्ही हाती घेतलेलं काम पूर्ण होईल. नशिबाची साथ तुमच्या बरोबर असणार आहे. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. सरकारी योजनांचा लाभ देखील मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासमोर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा पाहायला मिळेल. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम सुरु करु शकता. मित्रांच्या सहयोगाने तुमची अनेक ठरवलेली कामे पूर्ण होताना दिसतील. आर्थिक बाबतीत सक्षम असाल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, आर्थिक स्थिती देखील चांगली असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तसेच, तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला संवाद साधाल. व्यवसायाचा देखील विस्तार वाढलेला दिसेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. दिवसाच्या सुरुवातीलाच तुम्हाला धनलाभ होईल. तसेच, कामाच्या बाबतीत देखील संतुलन पाहायला मिळणार आहे. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. बॅंकेचे व्यवहार सुरळीत चालतील. इतकंच नव्हे तर, अनेक दिवसांपासून तुमच्यासमोर उभी असलेली संकटं देखील हळुहळू दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: