Astrology Panchang Yog 29 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 29 मार्च म्हणजेच शनिवारचा दिवस आहे. आजचा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आजचा दिवस शनी अमावस्येचा दिवस आहे. आजच्या दिवशी शनीचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. तसेच, चंद्राचा देखील मीन राशीत सहा ग्रहांसह प्रवेश होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी अनेक शुभ योग (Yog) जुळून आले आहेत. तसेच, आज शश राजयोगासह ब्रह्म योगाचा देखील शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. 

Continues below advertisement


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये चांगलं यश मिळेल. तसेच, नोकरीत देखील तुमचा काळ फार अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुम्हाला भावा-बहि‍णींचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमची आर्थिक संपत्ती चांगली असेल. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. धार्मिक कार्यात तुझी रुची वाढलेली दिसेल. मोठ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. जोडीदाराबरोबरचा तुमचा काळ चांगला जाईल. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला दिवसभरात एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, सामाजिक कार्यात तुमचा चांगला वावर असेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. तुम्हाला लवकरच नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती झालेली दिसेल. तुमच्या कुटुंबात आनंदी आणि प्रसन्न वातावरण असेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला लवकरच भेट देऊ शकता. मित्रांचा चांगला सपोर्ट मिळेल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. शनी देवाची तुमच्यावर विशेष कृपा असेल. त्यामुळे तुमच्या कार्यात कोणत्याच प्रकारचा अडथळा येणार नाही. आणि तुम्ही हाती घेतलेलं काम सहज पूर्ण होईल. तुम्हाला जर नोकरीत बदल करायचे असतील तर हा तुमच्यासाठी चांगला काळ आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 29 March 2025 : शनी अमावस्येचा दिवस 5 राशींसाठी असणार भाग्याचा; शनी देव देणार कर्माचं फळ, आजचे राशीभविष्य