Astrology Panchang Yog 29 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 29 एप्रिल म्हणजेच आजचा दिवस मंगळवार. आज वैशाख शुक्ल द्वितीया आणि तृतीया तिथीचा शुभ संयोग (Yog) जुळून आला आहे. आज चंद्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच वृषभ राशीत असणार आहे. तसेच, आज गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्याचबरोबर, आजच्या दिवशी सौभाग्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि कृतिका नक्षत्राचा शुभ संयोग देखील जुळून आला आहे. या शुभ योगांबरोबर आज त्रिपुष्कर योगाचा उत्तम संयोग आहे. आजच्या दिवशी शुभ राशींच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज संवादकौशल्य, मॅनेजमेंट यांसारख्या कामाशी संबंधित व्यक्तींना कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. तुमचा आजचा दिवस उत्साहात जाईल. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी तुमचा चांगला वेळ जाईल. समाजात मान-सन्मान वाढेल. तसेच, तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. मतभेद दूर होतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रसिद्धीचा असणार आहे. आज तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, नवीन कार्य करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित तुमच्या कामाकडे बघून तुमचे शत्रू देखील फार प्रभावित होतील. जोडीदाराच्या मदतीने तुमची कामे सहज पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच, लवकरच तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील. तसेच, तुम्हाला अप्रत्यक्षरित्या धनलाभ होईल. जे काम तुमचं अनेक दिवसांपासून रखडलेलं आहे ते काम तुमचं लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज भविष्याच्या बाबतीत तुम्ही फार आशावादी असाल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. नवीन योजनांचा लाभ घेम्यासाठी तुम्ही सक्षम असाल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या मेहनतीचं तुमच्या बॉसकडून कौतुक केलं जाईल. तसेच, अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, लवकरच तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :