Astrology Panchang Yog 28 February 2025 : आज 28 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस. आज महिन्यातला शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस अधिक खास आहे. आजचा दिवशी मालव्य राजयोगासह गजकेसरी योगाचा (Yog)महासंयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आजचा लाभ ज्या राशींना मिळणार आहे त्या राशींच्या लोकांवर भगवान विष्णूची कृपा बरसणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानाचा असणार आहे. आज तुमच्यावर कामाचा कोणताच दबाव असणार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असाल. तसेच, तुम्हाला अप्रत्यक्षरित्या तुम्हाला धनलभ मिळेल. तुमच्या घरातील वातावरण आनंदी पाहायला मिळेल. तसेच, आज आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती पाहायला मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आजचा दिवस दहावीच्या मुलांसाठी महत्त्वाचा असणार आहे. तसेच, तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तुमच्या कामाचं समाजात कौतुक केलं जाईल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, लवकरच तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर चांगला संवाद साधाल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा चांगला विस्तार झालेला दिसेल. तेच, मुलांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. आजचा दिवस भौतिक सुख-सुविधांचा असेल. आई-वडिलांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेलं कार्य लवकर पूर्ण होईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या कामातून तुम्हाला समाधान मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. फक्त मानसिक शांतीसाठी योग, ध्यान आणि योगासन करण्याची गरज आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज तुमच्या कामात तुमच्या मित्रांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमची चांगली प्रगती होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, धार्मिक कार्यात देखील तुमची चांगली एकाग्रता पाहायला मिळेल. लोक तुमच्या कामाचं चांगलं कौतुक करतील. तसेच, तुमच्यावर भगवान विष्णूचा आशीर्वाद असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: