Astrology : आज गौरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कर्कसह 'या' 5 राशींची संकटं होतील दूर, देवी लक्ष्मीची कृपा

Astrology Panchang Yog 11 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

Astrology Panchang Yog 11 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 11 जुलै म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. आजचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे. आजच्या दिवशी गौरी योग आणि अनुपम संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. आजच्या शुभ राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीच्या कृपेने चांगला लाभ मिळेल. 

Continues below advertisement

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. आज देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची सगळी कामे सुरळीत पूर्ण होतील. तसेच, कामातील सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. दिवसाची सुरुवात देवाचं नामस्मरण करुन करा. तसेच, जोडीदाराबरोबर चांगला व्यवहार करा. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस कमाईचा असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील. या संधीचा वेळीच लाभ घ्या. तसेच, गरजूंना मदत करा. दिवसाच्या सुरुवातीलाच सकारात्मक विचार करा. कामाचा जास्त ताण घेऊ नका. तसेच, सामाजिक ठिकाणी वावर ठेवा. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला अप्रत्यक्षपणे धनलाभ होईल. तसेच, तुमच्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. अनेत दिवसांपासून तुम्ही ज्या संधीची वाट पाहात होतात ती संधी आज तुमच्यासमोर चालून येईल. समाजात मान-सन्मान वाढलेला दिसेल. वैवाहिक जीवन सुरळीत असेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. तसेच, आज प्रियजनांच्या आठवणीत तुम्ही रमून जाल. तुमच्या व्यवसायात आज अनेक नवीन गोष्टींची भर पडेल ज्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. एकूणच तुमचं मन प्रसन्न असणार आहे. कामाचा कोणताच दबाव नसेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज समजुतीने व्यवहार करा. तसेच, कोणतंही नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तसेच, कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola