Swapna Shastra: रात्री आपल्यासोबत अनेक विचार, ताण-तणाव सोबत घेऊन आपण झोपतो. त्यामुळे झोप लागल्यानंतर पडणारी स्वप्नही त्यासंदर्भातच पडतात. पण, त्याव्यतिरिक्त अनेकदा आपल्याला फार विचित्र स्वप्न पडतात. स्वप्नात आपल्याला अनेक भयानक गोष्टी दिसतात. कधी साप दिसतो, तर कधी जेवणाचं ताट दिसतं, कधी दुष्काळ पडलेला दिसतो तर कधी पूर आलेला दिसतो. पण या पलिकडे जाऊन काही जणांना स्वप्नात स्मशान दिसतं किंवा एखादी प्रेतयात्रा दिसते. पण, ही स्वप्न बराच काळ आपल्या लक्षात राहतात... आपल्याला घाबरवून सोडतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? अशा स्वप्नांचाही काहीना काही अर्थ असतो.
स्वप्न शास्त्रानुसार (Swapna Shastra), जर तुम्हाला स्वप्नात एखादी प्रेतयात्रा किंवा स्मशान दिसलं असेल, तर त्यालाही काही ना काही अर्थ आहे. याचा नेमका अर्थ काय? सविस्तर जाणून घेऊयात...
स्वप्नात स्मशान दिसलं तर...? (If You See Cemetery In Your Dream?)
स्वप्नशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नात स्मशान दिसणं म्हणजे, शुभ संकेत असतो. याचा अर्थ की, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पुढे जाणार आहात आणि तुमची खूप भरभराट होणार आहे. जर कुणालाही स्वप्नात स्मशान दिसलं की, तुम्ही घाबरुन न जाता, तो शुभ संकेत समजला पाहिजे. याचा अर्थ आता लवकरच तुमच्या घरातली दुःख आणि दारिद्र्य दूर होणार आहे. तसेच, घरात सुख-समृद्धी नांदणार आहे. त्यामुळे अशी स्वप्न अजिबात इग्नोर करू नका.
स्वप्नात प्रेतयात्रा दिसली तर...? (If You See Funeral Procession In Your Dream?)
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात जर तुम्ही एखादी प्रेतयात्रा पाहिली तर, तर हादेखील शुभ संकेत असतो. याचाच अर्थ असा की, तुम्ही बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा आता पूर्ण होणार आहे. जर तुम्ही स्वप्नात स्वतःला स्मशानात जाताना पाहत असाल तर, याचाच अर्थ असा की, तुमच्यावर आलेलं एखादं खूप मोठं संकट लवकरच टळणार आहे. .
स्वप्नात प्रेतयात्रा किंवा प्रेत दिसणं याचाच अर्थ असा की, एखाद्याच्या आयुष्यातली सर्व दुःख, पीडा दूर होऊन आनंद येणार आहे. तसेच, त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळणार आहे. त्या व्यक्तीची भरभराट होणार आहे. तसेच, एखाद्या महत्त्वपूर्ण बदलाचा संकेतही होऊ शकतो.
याचाच एक अर्थ असाही काढला जातो की, लवकरच तुम्ही एखादं नवं काम सुरू करू शकता. किंवा मग तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याची नवी संधी मिळणार आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Astrology universe signs: जेवणात केस सापडणे कोणत्या गोष्टीचा संकेत? ज्योतिषशास्त्रात काय सांगितलंय?