Astrology Panchang Yog 23 February 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 23 फेब्रुवारीचा दिवस आहे. म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आज सूर्यदेवासह बुध आणि शनी ग्रहसुद्धा कुंभ राशीत परिक्रमण करणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. तसेच, आज सर्वार्थ सिद्धी आणि सिद्धी योग जुळून आला आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींना होणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही हातात घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. तुमचा व्यवसाय देखील सुरळीत चालेल. भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला आनंद घेता येईल. आज तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून भेटवस्तू देखील मिळू शकते. त्याचा आनंदाने स्वीकार करा.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुमचं वैवाहिक जीवन आनंददायी असेल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम या दरम्यान तुम्हाला पूर्ण करता येईल. मित्र-परिवाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल.तसेच, मानसिक शांतीसाठी तुम्ही योग, ध्यान करणं गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. पुण्याचं काम करत राहा. तुम्हाला चांगलं फळ मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, तुम्हाला भाग्याची चांगली साथ लाभेल. सामाजिक कार्यात तुम्ही सक्रिय व्हाल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या कलागुणांना चांगला वाव द्याल. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक यात्रेला सहभागी होऊ शकतात. यामुळे तुमची दानशूर वृत्ती देखील दिसून येईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल. त्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता जाणवणार नाही. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचा चांगला पाठिंबा मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन अगदी सुरळीत चालेल. शारीरिक व्यायाम करणं तुमच्या शरीरासाठी गरजेचं आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुमचा समाजात मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, तुम्ही जर व्यावसायिक असाल तर आज तुमच्यावर कामाचा जास्त ताण असेल. मात्र, ऑर्डर्स येत असल्यामुळे तुम्ही फार खुश असाल. जोडीदारबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. तुमच्या आरोग्यात पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: