Astrology : आज मालव्य राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस, लखपती होण्याची संधी चालून येणार

Astrology Panchang Yog 21 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

Astrology Panchang Yog 21 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 21 मे चा दिवस म्हणजेच आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस हा आपल्या लाडक्या गणरायाला (Lord Ganesha) समर्पित आहे. तसेच, आज चंद्राचा शुक्र राशीतून मीन राशीत प्रवेश होणार आहे, त्यामुळे मालव्य राजयोगाचा शुभ संयोग (Yog) जुळून येणार आहे. आज मेष बुध राशीत संक्रमण करुन कृतिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास आहे. आजच्या शुभ राशींवर लाडक्या बाप्पाची कृपा असणार आहे. 

Continues below advertisement

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज दिवसभरात तुमची भरपूर कमाई होईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, तुमच्या कामावर कोणी संशय घेणार नाही. गणरायाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार भाग्याचा असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भातील जुने वाद मिटतील. आज भावंडांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, समाजात तुमचा चांगला मान-सन्मान देखील राहील. जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतील. तसेच, तुमच्या मार्गातील सर्व अडथळे हळुहळू दूर होतील. त्याचबरोबर, तुमच्या व्यवसायाचाही चांगला विस्तार झालेला दिसेल. एकूणच तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या घरातील वातावरण देखील फार प्रसन्न असेल. त्यामुळे तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. लवकरच कुटुंबियांबरोबर तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच, गुंतवणुकीसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांवर आज गणरायाची विशेष कृपा असणार आहे. तुम्हाला लवकरच परदेशात जाण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर, कामाच्या ठिकाणी देखील सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा तुम्हाला मिळेल. धार्मिक कार्यात तुम्ही चांगले सहभागी व्हाल. तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, बिझनेसमध्ये नफा मिळेल. 

हे ही वाचा : 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 21 May 2025 : आज बुधवारच्या दिवशी 3 राशींवर खुश होणार लाडका बाप्पा; भरभरुन देणार आशीर्वाद, आजचे राशीभविष्य

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola