Rahu Ketu: ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 हे वर्ष खास आहे, हे वर्ष ग्रहांच्या संक्रमणामुळे खूप खास मानले जाते. ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू यांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह वक्री म्हणजेच उलट दिशेने जातात. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, मायावी ग्रह राहू आणि केतूने 18 मे 2025 रोजी राशी परिवर्तन केले आहे. याचा काही राशींना मोठा फायदा पाहायला मिळत आहे. तर काही राशींना अडचणींचा सामना करावा लागेल, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी?
वर्ष 2026 पर्यंत 3 राशींना अडचणींचा सामना करावा लागेल?
ज्योतिषींच्या मते, मायावी ग्रह राहूने 18 मे 2025 या दिवशी आपली राशी बदलली आहे. या दिवशी मायावी ग्रह राहूने मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश केलाय. जिथे तो 5 डिसेंबर 2026 पर्यंत राहू हा कुंभ राशीत राहील. त्यानंतर तो कुंभ राशी सोडून मकर राशीत जाईल. 18 मे रोजी मायावी ग्रह केतू आपली राशी बदलली आहे. या दिवशी केतू सुद्धी वक्री होऊन कन्या राशीतून सिंह राशीत गेला आहे. या राशीचा स्वामी सूर्य देव आहे. सूर्य देव आणि राहू किंवा केतू यांच्यात शत्रू संबंध आहे. 5 डिसेंबर 2025 पर्यंत केतू या राशीत राहील. त्यानंतर केतू सिंह राशी सोडून कर्क राशीत जाईल.
राहू आणि केतूच्या राशी बदलामुळे अनेक राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. चला जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 मध्ये 18 मे नंतर मिथुन राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. नोकरीत अनेक अडथळे येऊ शकतात. अधिकारी एखाद्या गोष्टीवरून रागावू शकतात.राहू केतूच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुमचा जोडीदार तुम्हाला फसवू शकतो, सावधगिरी बाळगा.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, 18 मे 2025 नंतर सिंह राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमची काही महत्त्वाची कामेही थांबू शकतात. तुम्ही आर्थिकदृष्ट्याही अडचणीत येऊ शकता. केतू सिंह राशीत भ्रमण करणार असल्याने या काळात तुमचे काही नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या करिअरकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी, 18 मे 2025 नंतरचा काळ कठीण असू शकतो. राहू कुंभ राशीत भ्रमण करेल. व्यवसायातील तुमच्या योजना अयशस्वी होऊ शकतात. जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर सखोल चौकशी करा. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी कठीण ठरू शकतो.
हेही वाचा :
Shani Dev: 3 जूनची पहाट 'या' 3 राशींचं नशीब पालटणारी ठरणार! शनि-सूर्याचा शक्तिशाली पंचक योग, आजपासून राजासारखं जीवन जगाल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)