Astrology Panchang Yog 20 January 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 20 जानेवारी सोमवारचा दिवस आहे. त्याचबरोबर पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तसेच सप्तमी तिथी आहे. तसेच, आज गुरु आणि चंद्र यांचा शुभ योग (Yog) जुळून आला आहे. त्याचबरोबर सुकर्मा योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींच्या पगारात चांगली वाढ होईल. तसेच, भगवान शंकराची कृपा असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून चांगला असणार आहे. आज तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, तुमच्या कामात तुम्हाला थोडाफार बदल करण्याची गरज आहे. अन्यथा सारखेपणा जाणवेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात देखील जावं लागण्याची शक्यता आहे. तुमचं भविष्य फार उज्ज्वल असणार आहे. आरोग्याची चिंता भासणार नाही.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा लाभेल. तसेच, तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या वाट्यातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच, तुमचं भविष्य फार उज्ज्वल असणार आहे. मात्र, मेहनतीला पर्याय नाही.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला कोणतीच चिंता भासणार नाही. तसेच, तुमच्या रचनात्मक आणि कलात्मक क्षमतेला चांगला वाव मिळेल. तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता भासणार नाही. तुमच्या कुटुंबात लवकरच एखादी शुभवार्ता तुम्हाला ऐकायला मिळू शकते. परदेशात काम करण्याची संधी मिळेल. तसेच, तुमची अनेक दिवासांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक वस्तूंचा लाभ मिळेल. त्यामुळे तुमचे मन कामात रमेल. तसेच, आज तुमची दूरच्या मैत्रीणीशी भेट होईल. यावेळी तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा द्या. व्यावसायिक क्षेत्रात देखील तुमचा चांगला विस्तार होईल. तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: