Astrology Panchang Yog 2 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा वार शुक्रवार. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आजच्या दिवशी वैशाख पंचमी उपरांत षष्ठी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग (Yog), रवि योग आणि पुनर्वसु नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच, आजच्या दिवशी मालव्य राजयोगचा शुभ योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या शुभ राशींसाठी आजचा दिवस सौभाग्यशाली असणार आहे. 

Continues below advertisement


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशीच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज वृषभ राशीसाठी मालव्य राजयोगाबरोबरच राशी परिवर्तनाचा देखील शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच, आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुमचं मन प्रसन्न असेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आजच्या दिवशी मालव्य राजयोग जुळून आला आहे. आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. कुटुंबात सुख शांती नांदेल. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुमच्या व्यवसायात चांगले दिवस येतील. तसेच, पार्टनरशिपमध्ये केलेल्या व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. पार्टनरबरोबर तुम्ही रोमॅंटिक डेटला जाऊ शकता. तुमच्या व्यवसायात तुम्ही चांगलं यश संपादन करु शकाल. जुन्या चुकांमधून चांगल्या गोष्टी तुम्ही शिकाल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्साहित असणार आहे. मालव्य राजयोग तुमच्या पंचम भावात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अप्रात्यक्षिक धनलाभ मिळेल. तुम्ही लव्ह लाईफ चांगली स्ट्रॉंग असेल. तसेच, देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असल्या कारणाने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमचं मन प्रसन्न राहील. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. तिसऱ्या भावात मालव्य राजयोग असल्यामुळे तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रसिद्धी दिसून येईल. भावा बहि‍णींबरोबर चांगले संबंध असतील. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन चांगलं रमेल. लवकरच यात्रेला जाण्याचे शुभ योग जुळून येणार आहेत. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 2 May 2025 : आज शुक्रवारच्या दिवशी 3 राशींनी राहावं सावध; राहू-केतूची पडू शकते वाईट नजर, आजचे राशीभविष्य