Astrology Panchang Yog 18 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 18 मेचा दिवस म्हणजेच आजचा वार बुधवार आहे. आजच्या दिवशी गणपतीची (Lord Ganesha) आराधना केली जाते. त्यांची पूजा केली जाते. तसेच, या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे या आठवड्यातील प्रत्येक दिवस खास असणार आहे. चंद्राने सुद्धा कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण केलं आहे. तसेच, आजच्या शुभ दिवसामुळे अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुमच्या भौतिक सुख-शांतीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम तुम्हाला आज पूर्ण करता येईल. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. मुलांच्या शाळादेखील सुरु झाल्या असल्याने ते आपल्या अभ्यासात नवीन गोष्टी शिकण्यात व्यस्त असतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशींसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगल्या लोकांचा पाठिंबा मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. व्यावसायिकांना कामाच्या निमित्ताने आज प्रवास करावा लागू शकतो. अशा वेळी आपली काळजी घेणं गरजेचं आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुमचे रखडलेले काम तुम्हाला पूर्ण करता येईल. तसेच, जर तुम्हाला लोन घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. देवी लक्ष्मीचा तुम्हाला पाठिंबा मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुमची संवादकौशल्य क्षमता वाढलेली दिसेल. तुमचं मन प्रसन्न राहील. तसेच, सकारात्मक विचार तुमच्या मनात येतील. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असल्या कारणाने तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज तुमचं व्यक्तिमत्व चारचौघांत उठून दिसेल. तसेच, तुमच्या भोवतालची परिस्थिती फार अनुकूल असणार आहे. जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :