Astrology Panchang Yog 16 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 16 मे 2025 म्हणजेच आजचा वार शुक्रवार. आजचा दिवस अनेक शुभ योगांसह (Yog) आणखी खास आहे. कारण आजच्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा शुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. तसेच, आज ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज चंद्रावर गुरु ग्रहाची शुभ दृष्टी पडून समसप्तक आणि गजकेसरी योग जुळून आला आहे. तसेच, आज मालव्य राजयोगाचा शुभ योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. आज गणरायाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, पैशांशी संबंधित अनेक शुभवार्ता तुम्हाला आज ऐकायला मिळतील. लवकरच तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुमचं व्यक्तिमत्व खुलून दिसेल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी तुमच्यासमोर निर्माण होतील. त्याचबरोबर भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही चांगला लाभ घेऊ शकाल. आजच्या शुभ योगामुळे लहान मुलांचाही हुरुप वाढेल. अनेक नवीन कलागुण शिकण्याची आवड निर्माण होईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचं मनोबल वाढवणारी माणसं तुम्हाला भेटतील. मानसिक तणावातून तुमची सुटका होईल. तसेच, आर्थिक स्थिती चांगली मजबूत असेल. उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तुमचं आरोग्य चांगलं राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, नोकरीत बदलाव करायचा असल्यास हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. भविष्याचा विचार करुन पैशांची गुंतवणूक तुम्ही कराल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुम्हाला अप्रत्यक्षपणे चांगला लाभ मिळेल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. पार्टनरबरोबर चांगला संवाद साधाल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)