Astrology Panchang Yog 14 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 14 सप्टेंबर 2025 चा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस आहे. तसेच, आज अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. तसेच, आज चंद्राने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आज शशि योग (Yog) आमि गजकेसरी योगासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. तसेच, आज आदित्य योगसुद्धा जुळून आला आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही सक्षम असाल. तसेच, तुमच्या कार्यात चांगलं यश दिसून येईल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळेल. आजच्या दिवसात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. तुमच्या कामात कोणता अडथळा येणार नाही.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. भौतिक सुख सुविधांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या संपत्तीत भरभराट झालेली दिसेल. तसेच, तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. नवीन गोष्टीची सुरुवात तुम्हाला करता येईल. तसेच, प्रॉपर्टीच्या संदर्भातील वादही आज मिटण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. तसेच, तुम्हाला घरच्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. मित्रांच्या सहयोगाने तुमची सगळी कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. भावा बहिणीतील वाद मिटतील. तसेच, तुमच्यामध्ये सकारात्मक विचार दिसून येतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ घेता येईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच,तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी तुमच्या भेटीगाठी होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :