Astrology Panchang Yog 1 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 1 नोव्हेंबर 2025 चा दिवस आहे. आजपासून नोव्हेंबर (November) महिन्याला सुरुवात झाली आहे. तसेच, आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. याला प्रबोधिनी एकादशी असं देखील म्हणतात. तसेच, चंद्राने कुंभ राशीत संक्रमण केलं आहे. आज सुनफा योगासह हंस राजयोग देखील निर्माण झाला आहे. तसेच, शतभिषा नक्षत्राच्या संयोगाने ध्रुव योग (Yog) आणि रवियोग निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. 

Continues below advertisement

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या शुभ राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असेल. आजच्या दिवसात काही नवीन नातेसंबंध निर्माण होतील ज्यामुळे भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुम्हाला मित्राच्या सहकार्याने तुम्हाला एखादं काम मिळू शकतं. तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक देखील करु शकता. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 

Continues below advertisement

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळेल. तसेच, आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असाल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. शुभ कार्यात सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. एकूणच कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. मुलांचं अभ्यासात मन रमेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. राजकीय क्षेत्रात तसेच समाज कार्यात तुम्ही सक्रिय असाल. समाजात तुम्हाला मान-सन्मान देखील मिळेल. आजच्या शुभ ग्रहांच्या स्थितीमुळे तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. सुख शांती मिळेल. मानसिक ताण जाणवणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. वडिलोत्पार्जित संपत्तीचा लाभ तुम्हाला मिळेल. घरातून बाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. लवकरच प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Horoscope Today 1 November 2025: नोव्हेंबरचा पहिलाच दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवांच्या कृपेने इच्छापूर्ती होईल, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा