Astrology Panchang Yog 1 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आहे. आजच्या दिवशी चंद्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आज मिथुन राशीत गुरु आणि शुक्र ग्रह एकत्र आल्याने गजलक्ष्मी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच, स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग देखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या कामकाजाचा चांगला विस्तार झालेला दिसेल. तसेच, तुम्हाला धनसंपत्तीचा चांगला लाभ मिळेल. तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तसेच, शत्रूंवर मात करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. नवीन व्यक्तींशी ओळख होईल. तसेच, तुमच्यातील कलागुणांना तुम्हाला चांगला वाव मिळेल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज दिवसाच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण पाहायला मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुमच्या प्रयत्नांना तुम्हाला यश मिळेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. मित्रांचा सहकार्य तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. तसेच, जर तुम्हाला नवीन वस्तूंची किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर आजचा दिवस फार खास असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस फार छान असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तसेच, तुमच्या प्रयत्नांना तुम्हाला चांगलं यश मिळेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :