Astrology Today 7 April 2024 : आज रविवार, 7 एप्रिल रोजी चंद्र कुंभ राशीनंतर मीन राशीत जाणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी असून या तिथीला मासिक शिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. मासिक शिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मयोग, मालव्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. वृषभ राशीचे लोक आज इतर लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावतील आणि रविवारच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतील. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळवण्याची चांगली संधी आहे. तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. जर तुम्हाला एखाद्या कामाची खूप दिवस काळजी वाटत असेल तर आज तुमचं काम पूर्ण होईल. तुमच्या पालकांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि त्यांच्या मदतीने तुमची अनेक कामं पूर्ण होतील.


मिथुन रास (Gemini)


आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. मिथुन राशीचे लोक आज मौजमजेच्या मूडमध्ये असतील. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसाठी काही भेटवस्तू खरेदी करू शकता, हे पाहून प्रत्येकजण तुमच्यावर खुश असेल. मित्रांसोबत वाद झाले असतील तर ते आज दूर होतील आणि जवळीक वाढेल. जर तुम्ही नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर तुमची इच्छा आज पूर्ण होईल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. आज व्यावसायिक इतर व्यवसायात देखील गुंतवणूक करू शकतात, त्यातून चांगला नफा मिळेल. तुमच्या भावंडांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार कराल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ ठरेल. सिंह राशीचे लोक आज आनंदी असतील. तुम्ही तुमच्या पालकांना मदत कराल. रविवारच्या सुट्टीमुळे संपूर्ण कुटुंब एकत्र राहील, सर्वजण मस्तीच्या मूडमध्ये दिसतील. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. जे लोक नोकरीसोबत अजून काही काम करण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छाही आज पूर्ण होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत मिळून काही मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्ही घरातील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचं मनही शांत राहील.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. तूळ राशीचे लोक आज काही नवीन काम करण्यासाठी उत्साही असतील आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात, ज्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. अध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. जर तुम्ही करिअरच्या संदर्भात कोणत्याही समस्येचा सामना करत असाल तर आज त्या समस्या सोडवल्या जातील. आज सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल आणि पैसे कमाईचे नवीन मार्गही उपलब्ध होतील.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज धार्मिक कार्यात रस असेल आणि आज तुम्हाला तुमचा अडकलेला पैसाही परत मिळू शकतो. आज तुमची नवीन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होताना दिसते. कुटुंबातील सदस्यांमधील जुने वैमनस्य आज दूर होईल. आज काही महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्ही कुटुंबात एक छोटीशी पार्टीही आयोजित करू शकता. नोकरदार लोक आज घरातून काम करू शकतात आणि व्यापारी दिवसभर व्यस्त राहतील. तुम्हाला मित्रांकडून काही चांगली बातमी मिळेल. आज तुम्ही लोकांकडून सहज काम करून घेऊ शकाल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Somvati Amavasya : सोमवती अमावस्येला बनले अनेक दुर्मिळ योग; 'या' 4 राशी होणार मालामाल, धनसंपत्तीत होणार वाढ