Astrology Today 5 May 2024 : ग्रहांची स्थिती पाहता, आज 5 मेचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, रविवार, 5 मे रोजी चंद्र मीन राशीत जात आहे, जिथे मंगळ, राहू आणि बुध हे ग्रह आधीच उपस्थित आहेत, त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असून या तिथीला प्रदोष तिथीचे व्रत पाळलं जाईल.


आज रवि प्रदोष व्रताच्या दिवशी चतुर्ग्रही योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशीच्या लोकांना शुभ योगाचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आज कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल. मिथुन राशीच्या लोकांना आज त्यांच्या मुलांची प्रगती पाहून आनंद होईल. आज व्यवसायात तुम्हाला चांगले लाभ मिळतील. तुम्हाला एकामागोमाग एक चांगल्या बातम्या मिळत राहतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल तर आज नशिबाच्या कृपेने ती गोष्ट पूर्ण होईल आणि तुमची चिंता दूर होईल. रविवारच्या सुट्टीमुळे तुम्ही मित्रांसोबत मजा करण्याचा आणि कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवण्याच्या मूडमध्ये असाल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कन्या राशीच्या लोकांच्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे, ते त्यांच्या अनुभवांचा चांगला फायदा घेतील, ज्यामुळे चांगले आर्थिक लाभ होतील. व्यवसायाशी संबंधित लोक आज चांगला नफा कमावतील. या राशीचे नोकरदार लोक रविवारच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतील आणि जुन्या मित्रांनाही भेटतील. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, रविवारच्या सुट्टीमुळे सर्व सदस्य घरीच राहणार असून लहान मुलांमुळे गोंगाटाचं वातावरण असेल. वैवाहिक जीवनात प्रेम राहील आणि सर्व प्रकारचे गैरसमज दूर होतील.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. तूळ राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात आज चांगली वाढ होईल, ज्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकतील. आज तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल. भागीदारी व्यवसायात उतरून यशाची चव चाखता येईल आणि वडिलांच्या मदतीने अनेक अपूर्ण कामं पूर्ण होतील. आज तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि तुमच्या मुलांच्या करिअरमधील प्रगती पाहून तुम्हाला आनंदही होईल. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित नफा मिळेल आणि तुमच्या मानधनात चांगली वाढ होईल. तुम्हाला एखादं वाहन, जमीन किंवा फ्लॅट इत्यादी खरेदी करायची असेल तर तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवन अनुकूल राहील आणि नातेवाईकांशी तुमचा समन्वयही चांगला राहील.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज सूर्यदेवाच्या कृपेने अडकलेले पैसे मिळतील आणि रविवारची सुट्टी असल्याने ते मित्रांसोबत काही वेळ घालवतील. ग्राहकांच्या गर्दीमुळे आज दिवसभर व्यापारी व्यस्त राहतील, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुम्हाला आराम मिळेल आणि तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा विचार तुम्ही कराल.


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. रविवारच्या सुट्टीमुळे तुमचा एखादा मित्र तुम्हाला खूप दिवसांनी भेटू शकतो. वडिलांसोबत काही मतभेद झाले तर आज तेही दूर होऊन नाते दृढ राहील. भागीदारीत कोणतेही काम करणे तुमच्यासाठी चांगले राहील, तुमच्यासाठी लाभाची शक्यता आहे. आज तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ होईल. आज तुम्ही काही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. जर तुम्ही मोठ्यांच्या सल्ल्याचं पालन केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील आणि तुम्हाला सकाळपासून अनेक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Rajyog : तब्बल 12 वर्षांनंतर कुबेर राजयोग बनल्याने 'या' राशींची होणार भरभराट; सोन्यासारखा पैसा येणार, सर्व स्वप्न पूर्ण होणार